आता बिनधास्त खा डोसा आणि सांबर; 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 11:22 AM2018-08-09T11:22:16+5:302018-08-09T11:24:42+5:30

साऊथ इंडियन डिशमधील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे डोसा आणि सांबर. संपूर्ण देशभरात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी हटके बेत म्हणजे डोसा. सध्या डोशाचेही अनेक प्रकार आढळून येतात. चीज डोसा, साधा डोसा, मैसुर मसाला, ओनियन डोसा.

Health Benefits of Eating Dosa and Sambar for Diabetes Weight Loss Constipation | आता बिनधास्त खा डोसा आणि सांबर; 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे!

आता बिनधास्त खा डोसा आणि सांबर; 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे!

Next

साऊथ इंडियन डिशमधील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे डोसा आणि सांबर. संपूर्ण देशभरात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी हटके बेत म्हणजे डोसा. सध्या डोशाचेही अनेक प्रकार आढळून येतात. चीज डोसा, साधा डोसा, मैसुर मसाला, ओनियन डोसा. आता तर या डोशांमध्ये आणखी एक नवीन प्रकार आला आहे, तो म्हणजे पिझ्झा डोसा. पण हा डोसा फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही लाभदायक असतो. डोशामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स, विटामिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे डोसा खाल्याने शरीराला आवश्यक ती पोषक तत्व मिळतात. एवढचं नाही जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीही तुमच्या डाएटमध्ये डोशाचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. डोसा तांदूळ आणि डाळीपासून तयार केला जातो. हा पचण्यासही हलका असून त्यामुळे पोटही भरल्यासारखे वाटते. जाणून घेऊयात डोसाचे आरोग्यदायी फायदे... 

1. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी

जर तुमचं वजन वाढत असेल आणि त्यासाठी तुम्ही डाएट करत असाल तर डोसा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. एका साध्या डोशामध्ये 37 कॅलरी असतात. त्यामुळे तो फार हलका असतो. पण जर डोशामध्ये बटाट्याची भाजी टाकली तर मात्र त्यातील कॅलरीज वाढतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी डोसा खात असाल तर साधा डोसा सांबरसोबत खा. त्यामुळे तुमच्या शरीराला फायबरही मिळेल. 

2. कार्बोहायड्रेटचा स्त्रोत

डोसा डाळ आणि तांदळापासून तयार होतो. त्यामुळे त्यामध्ये कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात असतं. जर तुम्ही डाएटिंग करत असाल तर तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, कारण कार्बोहायड्रेट शरीरासाठी लाभदायक असतात. हे शरीराला एनर्जी देतात. जर तुम्ही डोशामध्ये भाजी किंवा पनीर टाकून खाल्लंत तर कार्बोहायड्रेटसोबतच प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिनसारखी अन्य पोषक तत्वही मिळतात. 

3. मुबलक प्रमाणात प्रोटीन

आपल्या शरीराच्या विकासासाठी आणि सर्व अवयवांचं काम ठिक पद्धतीने होण्यासाठी प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावते. प्रोटीनमुळे शरीराला एनर्जी मिळते. त्यामुळे केस, हाडं आणि स्नायूंना मजबूती मिळते. डोसा प्रोटीनचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. जे लोकं शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी डोसा खाणं फायदेशीर ठरतं. यामुळे त्यांना मूबलक प्रमाणात प्रोटीन मिळतं. 

सांबारचे फायदे -

1. संपूर्ण जेवणातील पोषक तत्व

सांबार तयार करण्यासाठी अनेक गोष्टींचा उपयोग करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने शेवग्याच्या शेंगा, भेंडी, भोपळा, वांग आणि टॉमेटो यांसारख्या अनेक भाज्यांचा वापर केला जातो. त्यामुळे यामधून अनेक पोषक तत्वे शरीराला मिळतात. हे पचण्यासही हलकं असतं. 

2. बद्धकोष्टापासून सुटका

हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु सांबारमध्ये पाण्याची मात्रा अधिक असते. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्टाचा त्रास असेल तर सांबार खाणं फायदेशीर ठरतं. 

3. रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात रहाते. 

जर तुम्हाला मधुमेह असेल आणि डॉक्टरांनी डाएट कंट्रोलमध्ये ठेवण्यास सांगितले असेल तर सांबर हा सर्वात चांगला ऑप्शन असेल. कारण एक वाटी सांबरमध्ये 53.6 टक्के जीआय असतं. ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

4. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्ही वजन कमी करत असाल तर सांबराचा तुमच्या आहारात समावेश करा. कारण अनेक भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून तयार केलेलं सांबर पौष्टीक असतं. तसेच त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असतं.

Web Title: Health Benefits of Eating Dosa and Sambar for Diabetes Weight Loss Constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.