दूधाऐवजी फ्लेवर्ड मिल्क पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 07:52 PM2019-02-27T19:52:32+5:302019-02-27T19:53:53+5:30

दूधाचा आहारामध्ये समावेश करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये शरीराला आवश्यक अशी अनेक पोषक तत्व असतात. दूधामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि कॅल्शिअम यांसारखी अनेक पोषक तत्व असतात.

Is flavoured milk drinking instead of milk sufficient and healthy for health | दूधाऐवजी फ्लेवर्ड मिल्क पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

दूधाऐवजी फ्लेवर्ड मिल्क पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

Next

(Image Credit : The Pioneer Woman)

दूधाचा आहारामध्ये समावेश करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये शरीराला आवश्यक अशी अनेक पोषक तत्व असतात. दूधामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि कॅल्शिअम यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. परंतु प्रत्येकाला दूध पिणं शक्य नसतं. यामुळे अनेकजण फ्लेवर्ड मिल्कचा ऑप्शन सिलेक्ट करतात. यामध्ये मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांचा समावेश अधिक असतो. फ्लेवर्ड मिल्कचे अनेक प्रकार असतात. चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हेनिला इत्यादी. फ्लेवर्ड मिल्क चवीला उत्तम असले तरिही त्यामुळे अनेकदा तुमच्या आरोग्याला धोका पोहोचण्याचा धोका असतो. अशातच फ्लेवर्ड मिल्कबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. 

फ्लेवर्ड मिल्कच्या सेवनाने आरोग्यावर होतो परिणाम :

आर्टिफिशियल स्वीटनर असतं

फ्लेवर्ड मिल्कमध्ये आर्टिफिशियल गोडवा असतो, जो आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतो. यामुळे त्याची चव उत्तम लागते पण त्यामुळे शरीराला काही फायदा होत नाही. आर्टिफिशियल स्वीटनर शरीराला धोकादायक ठरतं. 

आरोग्यावर विपरित परिणाम होतात

फ्लेवर्ड मिल्क तयार करण्यासाठी अनेक वेगवेगळं साहित्य वापरण्यात येतं. हे सर्व साहित्य आरोग्यासाठी उत्तम असतचं असं नाही. या साहित्यामध्ये अनेक अशी तत्व असतात, जी शरीरासाठी हानिकारक ठरतात. तसेच शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर त्यांचा परिणाम होतो. 

कॅलरी अधिक असतात

फ्लेवर्ड मिल्कमध्ये कॅलरी मोठ्या प्रमाणावर असतात. ज्यामुळे फक्त आरोग्यावरच नाही तर वजनावरही परिणाम दिसून येतो. वजन वाढविण्याव्यतिरिक्त शरीरातील फॅट्सही वाढवतं.
 
कमी पोषक तत्व

दूधाच्या तुलनेत फ्लेवर्ड मिल्कमध्ये अत्यंत कमी पोषक तत्व असतात. त्यामुळेच यांचे सेवन केल्याने शरीराला काहीच फायदे होत नाहीत. 

फ्लेवर्ड मिल्कऐवजी दूध पिणंच फायदेशीर ठरतं. तुम्ही दूध थंड करूनही पिऊ शकता. अनेकजण दूध म्हटलं की, तोंड मुरडतात. त्यांना कितीही सांगितलं तरी दूधाचे फायदे पटत नाहीत. पण दूधाचे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. खासकरुन थंड दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. थंड दूध प्यायल्याने अॅसिडिटी, लठ्ठपणा, सारखी भूक लागणे यांसारख्या समस्या दूर होतात. 

थंड दूध पिण्याचे काही फायदे -

- थंड दूधात इलेक्ट्रोलाईट्स असतात. त्यामुळे डिहाड्रेशनपासून बचाव होतो. दिवसातून दोनदा थंड दूध प्यायल्यास तुम्ही नेहमी हाडड्रेट रहाल. दूध पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळची.

- व्यायामानंतर थंड दूध पिणे लाभदायी ठरते. यात मसल्ससाठी आवश्यक प्रोटीन्स असतात. तसंच दूधामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

- अ‍ॅसिडिटी क्षमवण्यासाठी आणि पेप्टिक अल्सरमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी थंड दूध पिणे फायदेशीर ठरते.

- जेवल्यानंतरही तुम्हाला सारखी भूक लागत असेल तर थंड दूध पिणे हा उत्तम उपाय आहे. थंड दूधात ओट्स मिसळूनही तुम्ही खाऊ शकता.

- थंड दूधामुळे गॅस होत नाही. अन्नपचनास मदत होते. यामुळे फॅट्स, तूप आणि तेल याचे चांगले पचन होते. 

- थंड दूध प्यायल्याने शरीराला ते नॉर्मल तापमानाला येण्यासाठी कॅलरीज बर्न कराव्या लागतील आणि त्यानंतर त्याचे पचन होईल. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

- कोमट दूध प्यायल्याने झोप लागते. कारण दूधात अमिनो अ‍ॅसिड ट्रिप्टोफन असते. पण थंड दूधामुळे हा त्रास होत नाही. उलट दूधातील पोषकघटक मिळतील.

- चेहऱ्यावर थंड दूध लावल्याने त्वचा स्वच्छ होते. तसंच त्वचा हाडड्रेट आणि मुलायम होते.

Web Title: Is flavoured milk drinking instead of milk sufficient and healthy for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.