तुम्हाला डायबिटीज आहे का? नाश्त्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 03:46 PM2018-11-30T15:46:23+5:302018-11-30T15:47:02+5:30

अनेकदा आपल्याला सांगण्यात येते की, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणं पोटभर करा पण रात्री मात्र थोडचं जेवा. कारण आपण जो नाश्ता करतो त्यावर आपला दिनक्रम अवलंबून असतो.

do you have diabetes start your day with 3 types of diabetic friendly dishes | तुम्हाला डायबिटीज आहे का? नाश्त्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर!

तुम्हाला डायबिटीज आहे का? नाश्त्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर!

Next

अनेकदा आपल्याला सांगण्यात येते की, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणं पोटभर करा पण रात्री मात्र थोडचं जेवा. कारण आपण जो नाश्ता करतो त्यावर आपला दिनक्रम अवलंबून असतो. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे आपल्याला पूर्ण दिवस काम करण्याची ताकद आणि ऊर्जा मिळते. रात्रीच्या जेवणानंतर रात्रभराच्या फास्टिंग मोडमधून बाहेर काढण्यासाठी नाश्ता फार आवश्यक असतो. तुम्ही जर डायबिटीक असाल तर सकाळी नाश्ता करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत जे डायबिटीक लोकांसाठी फायदेशीर ठरतील. 

सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला फार ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला सकाळचा नाश्ता मदत करतो. त्यामुळे नाश्ता टेस्टी असण्यासोबतच हेल्दी असणं फार गरजेचं असतं. आणि त्यात तुम्ही डायबिटिक असाल तर तुमच्यासाठी नाश्ता करणं फार महत्त्वाचं ठरतं. कारण नाश्त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स (glycaemic index) असणारे पदार्थ खाल्यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (American Diabetes Association) यांनी सांगितल्यानुसार, नाश्त्यामध्ये पीनट बटर किंवा आल्मंड बटर खाल्यामुळे शरीरामध्ये प्रोटीन (Protein) आणि कार्बोहायड्रेट (Carbohydrate) चे प्रमाण संतुलित राहते. जाणून घेऊया सकाळच्या नाश्त्यामध्ये खाण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या तीन पदार्थांबाबत...

तुमच्या डायबिटीज फ्री दिवसाची सुरुवात करण्यासाठी काही खास पदार्थ :

1. बनाना ओट ब्रेड (Banana Oat Bread) 

साधारणतः आपल्या नाश्त्यामध्ये ब्रेडचा समावेश करण्यात येतोच. परंतु तुम्हाला माहीत आहे का? ब्रेड मैद्यापासून तयार करण्यात आलेला असतो. यामध्ये कार्ब्स मोठ्याप्रमाणावर असतात. त्याचप्रमाणे यामध्ये फायबर आणि इतर पोषक तत्व फार कमी प्रमाणात असतात. जे शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषक नसतात. त्यासाठी आता केळी आणि ओट्स ब्रेडचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करून एका आरोग्यदायी दिवसाची सुरुवात करा. केळी आणि ओट्स ब्रेडचा नाश्त्यामध्ये समावेश केल्यामुळे शरीराला फाइबर, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतात. जे शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतात. 

2. पालक पॅनकेक्स (Spinach Pancakes)

पालक पचण्यासाठी हलकी असते तसेच यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासही मदत होते. पालक पॅनकेक तयार करण्यासाठी गव्हाचं पिठ, दूध, दही, मशरूम आणि पालकचा वापर करण्यात येतो. पालकची भाजी डायबिटीक लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कारण यामध्ये फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. 

3. ओट्सची इडली (Oats Idli)

ओट्सपासून तयार करण्यात आलेली इडली हाय ब्लड प्रेशर (high blood pressure) असणाऱ्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. अनेकदा हायपरटेंशन डाइटमध्येही (hypertension diet) ओट्सपासून तयार करण्यात आलेल्या इडलीचा समावेश करण्यात येतो. ही इडली चवीष्ट, आरोग्यदायी आणि मऊसर असते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे ब्लडशुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. 

Web Title: do you have diabetes start your day with 3 types of diabetic friendly dishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.