Diwali 2018 : दिवाळीसाठी ट्राय करा 'या' हटके रेसिपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 05:59 PM2018-11-05T17:59:56+5:302018-11-05T18:02:12+5:30

दिवाळीमध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. असातच घराघरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व असतं. अनेकदा गोड पदार्थ खाऊन कंटाळा येतो.

Diwali 2018 recipes make these delicious and healthy rabri pratha aloo rayta and kathal kabab | Diwali 2018 : दिवाळीसाठी ट्राय करा 'या' हटके रेसिपी!

Diwali 2018 : दिवाळीसाठी ट्राय करा 'या' हटके रेसिपी!

Next

दिवाळीमध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. असातच घराघरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व असतं. अनेकदा गोड पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशातच काही हटके आणि चटपटीत पदार्थ तुमची मदत करू शकतात. आज जाणून घेऊयात तीन वेगळ्या आणि खमंग अशा बटाट्याचा रायता, रबडी पराठा आणि फणसाचे कबाब तयार करण्याच्या कृतीबाबत. या रेसिपी घरातील बच्चेकंपनीपासून थोरामोठ्यांच्याही पसंतीस उतरतील. 

1. बटाट्याचा रायता

साहित्य :

  • 2 कप दही
  • 2-3 उकडलेले बटाटे 
  • 1/2 टी स्पून भाजलेलं जीरं
  • काळं मीठ
  • लाल मिरची पावडर 
  • बारिक चिरलेली कोथिंबीर
  • 1 ते 2 हिरव्या मिरच्या 

 

कृती :

- बटाटे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. 

- दह्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित फेटून घ्या.

- त्यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, काळं मीठ आणि जीरं टाकून मिक्स करा. 

- त्यामध्ये उकडलेले बटाटे मिक्स करा. 

- बारिक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा बटाट्याचा रायता.

2. रबडी पराठा

साहित्य :

  • 500 ग्रॅम गव्हाचं पीठ
  • एक लीटर दूध
  • 500 ग्रॅम साखर
  •  अर्धा छोटा चम्मचा वेलची पावडर 
  •  10 बदाम बारिक तुकडे करून
  •  5 ते 7 केशर
  •  10 पिस्ता बारिक तुकडे करून
  • 10 काजू बारिक तुकडे करून
  •  खोबऱ्याचा किस 
  •  अर्धा लीटर तूप
  •  पाणी

 

कृती :

- सर्वात आधी एका कढईमध्ये दूध उकळण्यासाठी ठेवा. 

- दूध थोडं घट्ट होईपर्यंत उकळून घ्या. 

- दूध आटल्यानंतर त्यामध्ये साखर मिक्स करा. 

- त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर, बदाम, पिस्ता, काजू आणि केशर टाकून व्यवस्थित एकजीव करा. 

- तयार रबडी एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. 

- आता एका दुसऱ्या कढईमध्ये तूप टाकून गरम होण्यासाठी ठेवा. 

- फ्रिजमधून रबडी काढा.

- आता पिठाचा गोळा घेऊन दोन पोळ्या लाटून घ्या. 

- आता पहिल्या पोळीवर 2 ते 3 चमचे रबडी पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर दुसरी पोळी टाकून किनारे दुमडून पराठा व्यवस्थित सर्व बाजूंनी बंद करून घ्या. 

- तयार पराठा गरम तेलामध्ये तळून घ्या. 

- दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजल्यानंतर पराठा एका तव्यामध्ये काढून घ्या. 

- गरम गरम रबडी पराठा खाण्यासाठी तयार आहे. 

3. फणसाचे कबाब

साहित्य :

  • फणसाचे गरे
  • चण्याची डाळ 1 कप
  • कांदा 2 
  • आलं
  • लसूण
  • जीरं
  • लवंग 4 ते 5
  • मोठी वेलची 2
  • हिरवी वेलची 2
  • हरी इलायची- 2
  • काळी मिरी पावडर 1/4 टीस्पून
  • जायफळ 
  • लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून
  • मीठ चवीनुसार
  • हिरवी मिरची 4 ते 5 
  • तेल 1 कप

 

कृती :

- फणसाचे कबाब तयार करण्यासाठी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. 

- त्यानंतर हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये चण्याच्या डाळीसोबत शिजवून घ्या. 

- आता त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, जीरं, लवंग , मोठी वेलची, जायफळ, काळी मिरची आणि कांदा बारिक वाटून घ्या. 

- आता तयार मिश्रणात कुकरमध्ये शिजवून घेतलेलं फणस आमि डाळ एकत्र करा. 

- आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ आणि पाणी मिक्स करा. 

- कुकरचं झाकण बंद करून मध्यम आचेवर शिजवून घ्या. 

- जेव्हा हे मिश्रण थंड होईल त्यानंतर हातांनी थोडं मळून घ्या.

- आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कापलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून फ्राय करा. 

- फ्राय केलेला कांदा फणसाच्या पेस्टमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्या. 

- छोटे छोटे गोळे तयार करून त्याला कबाबचा आकार द्या. 

- एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तयार कबाब तळून घ्या. 

- गरम गरम चटपटीत कबाब खाण्यासाठी तयार आहेत. 

Web Title: Diwali 2018 recipes make these delicious and healthy rabri pratha aloo rayta and kathal kabab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.