'या' ५ भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K चं भरपूर प्रमाण, रक्त आणि हाडांसाठी फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:18 PM2018-09-20T12:18:28+5:302018-09-20T12:19:04+5:30

व्हिटॅमिन K आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी फार गरजेचं असतं. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर जखम झाल्यावर किंवा कुठे कापल्यानंतर जास्त रक्त जातं.

Benefits of vitamin k and its best vegetable sources | 'या' ५ भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K चं भरपूर प्रमाण, रक्त आणि हाडांसाठी फायदेशीर!

'या' ५ भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K चं भरपूर प्रमाण, रक्त आणि हाडांसाठी फायदेशीर!

googlenewsNext

(Image Credit : www.webmd.com)

व्हिटॅमिन K आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी फार गरजेचं असतं. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर जखम झाल्यावर किंवा कुठे कापल्यानंतर जास्त रक्त जातं. जर या व्हिटॅमिनची शरीरात जास्त कमतरता असेल तर शरीराच्या अंगांमध्ये आतून ब्लीडिंग होऊ शकते. गर्भवती महिलांमध्येही बाळाच्या विकासासाठी 'के' व्हिटॅमिन फार गरजेचं असतं. यासोबतच या व्हिटॅमिनमुळे शरीराच्या अनेक समस्याही दूर होतात. पण काय तुम्हाला माहीत आहे 'के' व्हिटॅमिन कोणत्या आहारातून मिळतात? चला आज आम्ही तुम्हाला अशा ५ भाज्यांबाबत सांगणार आहोत ज्यातून तुम्हाला के व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात मिळतं. 

दोन प्रकारचे असतात व्हिटॅमिन 'के'

व्हिटॅमिन के चे दोन प्रकार असतात. एक व्हिटॅमिन के-१ आणि दुसरं व्हिटॅमिन के-२. हे व्हिटॅमिन के -१ हे आपल्याला फळं आणि भाज्यांमधून मिळतं. आणि व्हिटॅमिन के-२ हे आपल्याला जनावरांकडून मिळतं जसे की, दूध आणि दुधापासून तयार पदार्थांमधून. शरीरातील व्हिटॅमिनची कमरता दूर करण्यासाठी या पदार्थांचं सेवन गरणं गरजेचं आहे. 

कोबी

कोबीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के अधिक प्रमाणात आढळतात. त्यासोबतच यात फायबरही भरपूर प्रमाणात असतं. एका कोबीमध्ये ५३.२ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन के असतं. फ्लॉवरमध्येही व्हिटॅमिन के भरपूर असतं. 

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं. ब्रोकोलीमध्ये अनेक फायटोकेमिकल्स आणि अॅंटीऑक्सिडेंट्स असतात. एका ब्रोकोलीमध्ये जवळपास २२० मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन के असतं. त्यासोबतच यात लोह, प्रोटीन, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट, क्रोमियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सुद्धा आढळतं. ब्रोकोली तुम्ही कच्ची किंवा शिजवूनही खाऊ शकता. 

पालक

पालक भाजीमध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे अॅनिमिया दूर करण्यासाठी पालक सर्वात चांगली भाजी मानली जाते. त्यासोबतच पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीनही असतं. तसेच पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन के सुद्धा भरपूर असतं. याने हाडे मजबूत होतात. 

शलजम

शलजम ही फार पौष्टिक भाजी मानली जाते. पण या भाजीबाबत अनेकांना माहीत नसतं. शलजम डोळ्यांसाठी आणि हाडांसाठी फायदेशीर असते कारण याक व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के दोन्ही भरपूर प्रमाणात आढळतात. शलजमच्या अर्धा कप भाजीमध्ये जवळपास ४४१ मिलीग्रॅम व्हिटॅमिन ए आणि ८५१ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन के असतं. तर कॅलरी केवळ २४ असतात. 

बीट

बिटाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लाल रंगाच्या या भाजीमुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढतं. कारण यात आयर्न भरपूर प्रमाणात असतं. याच्या कपामध्ये २७६ मिलीग्रॅम व्हिटॅमिन ए, ६९७ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन के आणि केवळ १९ कॅलरी असतात. 

Web Title: Benefits of vitamin k and its best vegetable sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.