सध्या ट्रेंडमध्ये आहे 'ही' ज्वेलरी; तुम्हीही ट्राय करू शकता!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 01:02 PM2018-09-17T13:02:20+5:302018-09-17T13:02:49+5:30

दागिने म्हटलं की स्त्रियांचा आवडता विषय. परंतु वेळेनुसार दागिन्यांमध्ये बदल घडून येत आहेत. सध्या नवनवीन ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ घालत असतात. अशातच नवनवीन दागिनेही ट्रेन्ड करत असतात.

trending coloured and neon jewellery is in fashion nowadays | सध्या ट्रेंडमध्ये आहे 'ही' ज्वेलरी; तुम्हीही ट्राय करू शकता!

सध्या ट्रेंडमध्ये आहे 'ही' ज्वेलरी; तुम्हीही ट्राय करू शकता!

Next

दागिने म्हटलं की स्त्रियांचा आवडता विषय. परंतु वेळेनुसार दागिन्यांमध्ये बदल घडून येत आहेत. सध्या नवनवीन ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ घालत असतात. अशातच नवनवीन दागिनेही ट्रेन्ड करत असतात. सध्या स्त्रिया ट्रेन्डींगमध्ये असलेल्या दागिन्यांकडे आकर्षित होताना दिसतात. मग मॅचिंग ड्रेसेसनुसार दागिनेही मॅचिंग केले जातात. पण सध्या कलर्ड ज्वेलरीचा ट्रेन्ड सुरू आहे. ज्वेलरी डिझाइनर्सही या दागिन्यांच्या वाढत्या मागणीला पाहून नियॉन आणि फ्लोरोसेंट कलर्ड ज्वेलरींवर वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. परंतु हे दागिने वपरण्याआधी काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. 

- कलर्ड डायमंड स्टोन असलेली डायमंड ज्वेलरी कधीही आणि कोणत्याही निमित्ताने तुम्ही वापरू शकता. 

- कलर्ड ज्वेलरी वापरताना आपल्या ड्रेससोबत ती ज्वेलरी मॅच होत आहे ना? ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर ड्रेसचा रंग वेगळा आणि ज्वेलरीचा वेगळा असेल तर त्यामुळे तुमच्या लूक बिघडण्याची शक्यता असते. 

- जर हलक्या किंवा पेस्टल रंगांच्या ड्रेससोबत तुम्हाला ज्वेलरी वेअर करायची असेल तर मल्टी कलर्ड  फ्लोरोसेंट  नेक पीस तुमच्यासाठी हटके पर्याय ठरेल. 

- एका रंगाच्या कपड्यांसोबत मल्टी कलर्ड ज्वेलरी वापरता येऊ शकते. 

- तुमच्या ड्रेसिंगवर जर तुम्ही एखादा ज्वेलरी सेट घालणार असाल तर त्यामध्ये एकच पीस हेव्ही असणं गरजेचं आहे. जर तुमच्या गळ्यातील नेक पीस हेव्ही लूक देणारा असेल तर त्यावर हलक्या कलरच्या बांगड्या किंवा रिंग वापरावी. 

- फ्लोरोसेंट रंगाची ज्वेलरी कॅज्युअल ड्रेसेस, डेनिम्स आणि स्कर्ट्सवर सूट होते. 

-एथनिक वेअरवर हेव्ही प्रेशियस स्टोन ज्वेलरी वापरू शकता. 

- इंडो वेस्टर्न ड्रेससोबत फक्त एक प्रेशियस स्टोन असेलेला स्टेटमेंट पीस तुम्हाला हटके लूक देण्यास मदत करेल. 

- पार्टीमध्ये जाण्यासाठी तयार होत असाल तर एका चैनसोबत मल्टी कलर्ड स्टोनचं पेंडेंट फार सुंदर लूक देईल.

-  डार्क रंगाचा ड्रेस वे्र केला असेल तर त्यासोबत फ्लोरोसेंट आणि हलक्या रंगाच्या कपड्यांसोबत नियॉन कलर्ड ज्वेलरी फार ट्रेन्डींगमध्ये आहे. 

- एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, ज्या प्रकारची ज्वेलरी तुम्ही वापरणार आहात, ती तुमच्य़ा ड्रेसिंग स्टाइलवर सूट झाली पाहिजे नाहीतर तुमचा लूक बिघडू शकतो. 

Web Title: trending coloured and neon jewellery is in fashion nowadays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.