​OMG : कमाई कमी तरी "या" कारणाने तरुणाई करते जास्त खर्च !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 12:56 PM2017-09-22T12:56:26+5:302017-09-22T18:26:26+5:30

नुकतेच याबाबत एक संशोधन करण्यात आले असून त्यात, कमी पगार असलेले लोक या कारणासाठी जास्त पैसे खर्च करतात, जाणून घ्या काय आहे ते कारण...!

OMG: Reduce earnings, "this" causes the youth to spend more time! | ​OMG : कमाई कमी तरी "या" कारणाने तरुणाई करते जास्त खर्च !

​OMG : कमाई कमी तरी "या" कारणाने तरुणाई करते जास्त खर्च !

Next
चित्रपटसृष्टीचे पडसाद तरुणाईवर एवढ्या मोठ्या प्रमाणात उमटत आहेत की, स्वत:ची मिळकत अगदी कमी असूनही आपण सेलेब्ससारखे दिसावे, त्यांच्यासारखी आपली राहणीमान असावी आणि स्वत:ला श्रीमंत समजण्यासाठी आजची तरुणाई खूप मोठा खर्च करताना दिसत आहे. नुकतेच याबाबत एक संशोधन करण्यात आले असून त्यात, कमी पगार असलेले लोक स्वत:ला श्रीमंत दाखवण्यासाठी जास्त पैसे खर्च करतात.

यूसीएल स्कूल आॅफ मॅनेजमेंटतर्फे करण्यात आलेल्या अध्ययनाचे सह-लेखक जो ग्लेडस्टोन यांनी सांगितले की, जेव्हा लोक मर्यादित साधनांमध्ये आपल्या गरजा भागवत असतात तेव्हा ते आपले राहणीमान व व्यक्तिमत्वाकडे अधिक लक्ष देतात. यावरून स्वत:ला हाय स्टँडर्ड दाखवण्याच्या नादात असे लोक कुठल्या आर्थिक अडचणींचा सामना करतात हे जाणून घेण्यास मदत होते.  

मानसिक आरोग्य विज्ञान या पत्रिकेत प्रकाशित या संशोधनानुसार जे लोक कमी कमावतात त्यांना समाजात आपले स्थान कमी वाटते. याची भरपाई करण्यासाठी हे लोक स्वत:ते स्टेटस वरचढ दाखवणाऱ्या वस्तूंमध्ये जास्त पैसे खर्च करतात.
 
यापूर्वीच्या संशोधनात आढळले की, जे लोक अधिक सामाजिक असतात त्यांना आपले सोशल स्टेटस मेंटेन करण्याची जास्त आवड असते. परंतु नवीन संशोधनात या गोष्टीवर भर दिला की, सोशल स्टेटस मेंटेन करण्याकडे त्या लोकांचा अधिक भर असतो ज्यांची कमाई सामान्यत: कमी असते. 

ब्रिटनच्या एका बहुराष्ट्रीय बँकेच्या सहयोगाने हे संशोधन करण्यात आले. ग्राहकांना एक मानक व्यक्तिमत्व प्रश्नावली विचारण्यात आली. यातील उत्तरे बँकेच्या व्यवहाराशी जुळवून निष्कर्ष काढण्यात आले. या संशोधनात १२ महिने ७१८ ग्राहकांच्या हजारो देवणा-घेवाणींचे विश्लेषण करण्यात आले. वय, लिंग, रोजगाराची स्थिती इत्यादी अन्य कारणे लक्षात घेऊन निष्कर्ष काढण्यात आला. यावेळी निष्कर्ष अचूक येण्यासाठी नगदी व्यवहारदेखील लक्षात ठेवण्यात आला. 

प्रत्येक व्यक्तीचे खर्चाचे आकडे एक (लो स्टेटस) अंकापासून पाच अंकी (हाय स्टेटस) आकड्यांपर्यंतच्या श्रेणीत क्रमबद्ध करण्यात आले. हाय स्टेटस लोकांच्या श्रेणीत विदेशी विमान प्रवास, गोल्फ, इलेक्ट्रॉनिक्स व कला संस्था यांचा समावेश होता, तर लो स्टेटस श्रेणीत सावकार, साल्वेज यार्ड व डिस्काउंट स्टोअरचा समावेश होतो. 

यावरून लक्षात येते की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना दिखाऊपणा करण्याची सवय नसते. परंतु ज्यांची कमाई कमी आहे ते स्वत:ला आपण हाय स्टेटसचे असल्याचे दाखवण्याच्या नादात आपले बँक बॅलन्स उडवतात.

Web Title: OMG: Reduce earnings, "this" causes the youth to spend more time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.