OMG: Actress acted in 'Impress' seeing Rahul Gandhi! | OMG : राहुल गांधीला पाहून ‘ही’ अभिनेत्री झाली इंप्रेस !

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अमेरिकेच्या विश्वविद्यालयांमध्ये भाषण देण्यासोबतच आपल्या अमेरिका दौºयात फिल्म स्टार्सची भेट घेण्यातही व्यस्त असून हॉलिवूड अभिनेत्री नथालिया रामोस राहुल गांधींच्या या दौऱ्यामुळे चांगलीच प्रभावित झाली आहे. आपल्याला राहुल गांधी यांची भेट घेण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते असे ती म्हणाली.

राहुल गांधींसोबत फोटो नथालिया रामोस हिने इंन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला आहे. उत्तम वक्ता आणि व्यवहार कुशल असलेल्या राहुल गांधींची काल रात्री भेट घेतली. मी स्वत:ला जगातील विविध भागांतून आलेल्या महान विचारवंतांची भेट घेवून आणि त्यांचे विचार ऐकून भाग्यवान समजते. चांगल मन आणि चांगले हृदय असेल तरच बदल घडवता येतो. माज्या विचारांना योग्य दिशा दिल्याबद्दल मनापासून आभार असे तिने म्हटले. १४ सप्टेंबरच्या रात्री ही पोस्ट नथालियाने शेअर केली आहे.
 
फोटो पाहून असे वाटते की, दोघांनी पोज देऊन सोबत फोटो काढला आहे किंवा भारताच्या दिग्गज राजकारणी व्यक्तिमत्त्वासोबत फोटो काढण्याचा आग्रह केला असेल. या अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये हा फोटो अपलोड करुन कॅप्शन लिहिले आहे की, ‘मला आनंद वाटत आहे की, जगातील वेगवेगळ्या भागातील प्रतिभाशाली विचारवंताना ऐकणे आणि त्यांना मिळण्याची संधी मिळाली.’  

कोण आहे नथालिआ रामोस?
नथालिआ रामोस एक स्पेनिस-आॅस्ट्रेलियन अभिनेत्री आहे. ती २००५ पासून इंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहे, मात्र २००७ मध्ये ब्रेट्ज चित्रपटापासून तिची ओळख निर्माण झाली. तिने टीव्ही सीरीजमध्येही काम केले आहे. तिचा जन्म जुलै १९९२ मध्ये स्पेनच्या मेड्रिडमध्ये झाला होता. तिची आई आॅस्ट्रेलियन असून वडिल स्पॅनिश आहेत. तिचे पालनपोषन आॅस्ट्रेलियाच्या मेलबोर्नमध्ये आणि त्यानंतर मियामीमध्ये झाले ज्याठिकाणी तिने हायस्कूलपर्यंत शिक्षण घेतले. ती आपल्या आईला यहूदी समजते आणि २ जून २०१६ ला तिला अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त झाले.        
  
Web Title: OMG: Actress acted in 'Impress' seeing Rahul Gandhi!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.