तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2016 04:32 PM2016-03-16T16:32:56+5:302016-03-16T09:32:56+5:30

आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते. यावरच तुमचा संपूर्ण दिवस कसा जाईल हे अवलंबून असते.

How does your day start? | तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते ?

तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते ?

Next

/> त्याकरिता सकाळी लवकर उठणे हे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर नेहमी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.
आपण आनंदी असलो तरच दुसºयालाही आनंद देऊ शकतो. त्याकरिता जुन्या संस्कृतीही जपणे फार महत्वाचे आहे. यामुळे आनंद वाढल्याशिवाय राहत नाही. जुन्या आठवणी यासुद्धा आनंद वाढविण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळेच जीवनालाही अर्थही प्राप्त होतो. मित्रांना घरी जेवायला बोलावले तरीसुद्धा तुमचा आनंद वाढू शकतो. आपल्या व्यस्त वेळेतून थोडा वेळ मुलांसाठी सुद्धा काढा त्यामुळे कु टुंबालाही आनंद मिळेल.  आपला मुड हा नेहमी चांगला असावयाला हवा. खोटे बोलाणे हे टाळावे, त्यामुळे आनंद चेहºयावर दिसून येत नाही. चेहºयावर नेहमी हास्य असू द्या त्यामुळे इतरजणही आपल्यामुळे खुश होतात. आनंदीत राहण्यासाठी वाचन व लिखाण करणेही आवश्यक आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केले हे सुद्धा लिहीण्याची सवय करावी. त्यामुळे आपला आनंद वाढण्यास मदत होते. कार्यालयात आपल्या प्रमुखाने  कोणतेही काम सांगितले. तर त्याबद्दल नकारात्मक विचार न करता नेहमी सकारात्मक विचार करा. त्यामुळे ते काम अवघड होण्यापेक्षा उलट सोपे होते. प्रत्येक नवीन कामातून स्वत: शिकायला मिळते. हे कधीही विसरु नका. त्याकरिता जीवनात चांगल्या सवयी लावणे हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही जीवनभर आनंदी राहू शकता.

 

Web Title: How does your day start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.