Diwali 2017: This year's Diwali is more stylish by the help of sneakers! | Diwali 2017 : ​यंदाच्या दिवाळीत स्नीकर्सच्या साह्याने दिसा अधिक स्टायलिश !

दिवाळी म्हटली म्हणजे आकर्षक रोषनाई, फटाके, जल्लोष, विविध मिठाईचे पदार्थ शिवाय स्टायलिश दिसण्यासाठी नवनवीन कपड्यांची खरेदी आलीच. प्रत्येकजण या सणासुदीत स्टायलिश दिसण्यावर भर देण्याचा प्रयत्न करीत असतो. आम्ही आपणास काही खास टिप्स देत असून त्याद्वारे आपण नक्कीच अधिक स्टायलिश दिसाल. 

आपण जे काही कपडे खरेदी करणार आहोत, ते अधिक आकर्षक दिसण्यासाठी आपण स्नीकर्स वापरू शकता. कारण स्नीकर्सना सर्वात कम्फर्टेबल फुटवेअर मानले जाते. हे कम्फर्टेबल नव्हे तर स्टायलिशही दिसतात. आपल्या कोणत्याही कपड्यांसोबत स्नीकर्स कॅरी करून तुम्ही कॅज्युअल लूक मिळवू शकता.

स्नीकर्समध्ये सध्या पांढऱ्या स्नीकर्सचे चलन आहे. हे स्नीकर्स वापरून तुम्ही कोणत्याही कपड्यांची स्टाईल बदलवू शकता. खालील गोष्टींसोबत तुम्ही स्नीकर्सचे कॉम्बिनेशन करू शकता. 

Image result for sneakers

* स्नीकर्स व मिनी स्कर्ट 
पार्टी किंवा हँगआऊटसाठी तुम्ही मिनी स्कर्ट घालणार आहात तर यासोबत स्नीकर्स घाला. हे पार्टीत तुमची स्टाईल व कम्फर्ट दोन्ही कायम ठेवतील. 

* स्नीकर्स व शॉर्ट ड्रेसचे कॉम्बिनेशन 
आतापर्यंत तुम्ही शॉर्ट ड्रेसवर फक्त हील्स किंवा फ्लॅट्स ट्राय कॅरी केले असेल. आता यांना वेगवेगळ्या स्नीकर्ससोबत ट्राय करा. यामुळे तुम्हाला स्टायलिश व युनिक लूक मिळेल. 

* मेटॅलिक स्कर्टसोबत स्नीकर्सचे कॉम्बिनेशन 
तुम्ही मेटॅलिक स्कर्टसोबत स्नीकर्स ट्राय केले नसतील तर नक्की करून बघा. कूल, कम्फर्टेबल व स्टायलिश या तीनही कारणांसाठी हे बेस्ट आहेत. 

Image result for sneakers

* स्नीकर्स व जंपसूट कॉम्बिनेशन 
आपल्या प्लेन, फ्लोरल व स्ट्राईप जंपसूटला स्नीकरसोबत पेअर करा. जंपसूट व स्नीकर्सचे कॉम्बिनेशन तुम्ही कॅज्युअलपासून फॉर्मलपर्यंत प्रत्येक ड्रेससोबत कॅरी करू शकता. 

* लेदर ड्रेससोबत स्नीकर्स 
पार्टीत आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही लेदर ड्रेस घालणार असाल तर त्याच्यासोबत स्नीकर्स घाला. 

* स्नीकर्स व मॅक्सी 
मॅक्सीमुळे तुम्हाला गर्ली लूक मिळतो. यासोबत हील्सचे कॉम्बिनेशन परफेक्ट दिसते. परंतु आपले स्नीकर्स घालूनही तुम्ही मॅक्सी घालू शकता. तुमचा गर्ली लूक कायम ठेवत हे तुम्हाला वेगळेपणा देतात. 

Diwali 2017 : दिवाळीत मौज-मस्तीबरोबरच आरोग्यही सांभाळा !

 
Web Title: Diwali 2017: This year's Diwali is more stylish by the help of sneakers!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.