मागील काही वर्षांपासून फॅशन वर्ल्डमध्ये एक नवीन ट्रेन्ड पहायला मिळत आहे. जो हळूहळू सर्वांच्या आकर्षणाचा भाग बनत आहे. खासकरून त्या तरूणींमध्ये ज्या लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. सध्या वेडिंग गाउनपासून ते अगदी लेहेंग्यांवरही आपल्या जवळच्या व्यक्तींची नाव लिहिण्याचा ट्रेन्ड आहे. प्रियंका चोप्रापासून ते दीपिका पादुकोनपर्यंत सगळ्याचजणी हा ट्रेन्ड फॉलो करत आहेत. काही दिवसांपूर्वीच नीता अंबानीही हा ट्रेन्ड फॉलो करत असल्याचे पाहायला मिळते.  

नीता अंबानी यांनी लिहीलं सूनेंचं आणि मुलाचं नाव

काही दिवसांपूर्वीच आकाश अंबानीचा शाही विवाहसोहळा पार पडला. आपल्या मुलांच्या लग्नामध्ये नीता अंबानी यांनी एक मल्टीकलर्ड लहेंगा-चोली वेअर केली होती.

नीता अंबानी या लेहंग्यामध्ये फार सुंदर दिसत होत्या. परंतु, त्यांच्या लेहेंग्यापेक्षा त्यांचा ब्लाऊज अत्यंत सुंदर दिसत होता.

ज्यामध्ये त्यांनी आपला मुलगा आकाश आणि सुन श्लोकाच्या नावासोबतच  'शुभारंभ' असंही लिहिलं होतं. नीता अंबानींचा हा ब्लाऊज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. 

दीपिकाने लिहिलं 'सौभाग्यवती भव:'

नीता अंबानीच्या आधी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोनही हा ट्रेन्ड फॉलो करताना दिसून आली. जर तुम्हाला आठवत असेल तर दीपिकाने आपल्या लग्नात लेहेंगा परिधान केला होता.

त्यावर तिने घेतलेल्या चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव:' असं लिहिलं होतं. दीपिकाची ही चुनरही फॅशन वर्ल्डमध्ये चर्चेचा विषय बनली होती. 

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोपडाने हिंदू पद्धतीसोबतच ख्रिश्चन पद्धतीनेही निक जोनससोबत विविह केला. तिने आपल्या वेडिंग गाउनवर 'माय जान' (My Jaan) असं लिहिलं होतं.

एवढचं नव्हे तर तिने आपल्या गाउनवर वेडिंग डेटही लिहिली होती. प्रियंकाचा हा गाउन राल्फ लोरेन यांनी डिझाइन केला होता. 

सामंथाचा 'हटके' अंदाज

सध्या अनेक अभिनेत्री हा ट्रेन्ड फॉलो करताना दिसत आहेत. पण या सर्वांच्या आधी साउथची अभिनेत्री सामंथा हा ट्रेन्ड फॉलो करताना दिसून आली.

तिने आपल्या एन्गेजमेंटच्या साडीवर आपली पूर्ण लव्ह स्टोरी आणि फॅमिली मेंबर्सच्या आठवणी डिझाइन केल्या होत्या. सामंथाची ही साडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. 


Web Title: Celebrities who got names woven on their lehenga and wedding outfits
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.