‘त्या’ तलाठ्याने असे काय ‘घोडे’ मारले?

By गजानन दिवाण | Published: January 1, 2018 12:40 AM2018-01-01T00:40:20+5:302018-01-01T00:41:04+5:30

अनेक ठिकाणी जायला वाहतुकीची साधने नाहीत. एका शेतातून दुसºया शेतात जायचे असेल, तर दुचाकीही वापरता येत नाही. एका तलाठ्यावर किमान तीन ते पाच गावांचा भार. त्यातही वाहतुकीचे हे हाल. मग वेळेत पंचनामे कसे होणार? हाच विचार करून शेतकºयानेच एखाद्या तलाठ्याला स्वत:चा घोडा दिला, तर बिघडले कुठे? मुळात औरंगाबाद जिल्ह्यातील आंचलगावात हेही घडले नाही.

 What did that 'horse' hit with 'talent'? | ‘त्या’ तलाठ्याने असे काय ‘घोडे’ मारले?

‘त्या’ तलाठ्याने असे काय ‘घोडे’ मारले?

googlenewsNext

भारत हा आज दुचाकी-चारचाकींचा देश झाला आहे. कधी काळी तो अश्वराष्ट्र म्हणून ओळखला जायचा. प्रत्येकाच्या घरी घोडा असायचा. घरातील वाहक म्हणून त्याचाच वापर होत असे. घरात घोडा असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. पाटलांची पाटीलकी आणि जहागीरदारांची जहागिरी या घोड्यावरूनच चालत असे. एवढेच काय १९व्या शतकापर्यंत मुंबईतील प्रवासी वाहतूकही छकडा, टांगा आणि पालखीतूनच व्हायची. पुढे मुंबईचा पसारा वाढत गेला तशी घोड्यांची जागा टॅक्सीने आणि आपल्या घरातील जागा दुचाकी-चारचाकीने घेतली. एकूणच काय तर आम्हा माणसांना घोड्यांचा वापर नवा नाही. मानवाने घोडे माणसाळवून त्यांचा वाहन म्हणून अगदी प्राचीन काळापासून उपयोग केला आहे. घोड्यांचा एवढा मोठा इतिहास आपल्या पाठीशी असताना औरंगाबाद जिल्ह्यातील आंचलगाव येथे तलाठी आणि कृषी सहायकाने घोड्यावर बसून कापसाचा पंचनामा केल्याचे वृत्त सर्वत्र चवीने चघळले गेले.
राज्यात जवळपास ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस हे पीक आहे. मराठवाडा आणि विदर्भात बोंडअळीने सगळेच्या सगळे कापसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्राचे पंचनामे कसे करायचे यावरून तलाठ्यांच्या स्तरावर मोठा गोंधळ उडाला. पूर्वी तलाठी सज्जावरच पंचनामे झाल्याच्या नोंदी करण्याची पद्धत सर्रासपणे चालायची. आता त्यासाठीचे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठ्याला त्या शेतात जाणे अपरिहार्य झाले. पूर्वी खेडोपाडी शेतकरी तलाठ्याला गाठायचे. यंदा पहिल्यांदाच पंचनाम्यासाठी तलाठी बाहेर पडले. कधी नव्हे ते शेतीच्या बांधावर दिसले. अनेक ठिकाणी जायला वाहतुकीची साधने नाहीत. बºयाच ठिकाणी रस्ते नाहीत. आहेत त्या रस्त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. एका शेतातून दुसºया शेतात जायचे असेल, तर दुचाकीही वापरता येत नाही. एका तलाठ्यावर किमान तीन ते पाच गावांचा भार. त्यातही वाहतुकीचे हे हाल. मग वेळेत पंचनामे होणार कसे? पंचनामे नाही झाले, तर नुकसान कोणाचे? हाच विचार करून शेतकºयानेच एखाद्या तलाठ्याला पंचनामे करण्यासाठी स्वत:चा घोडा दिला, तर बिघडले कुठे?
पूर्वी कार्यालयात बसून कागदीघोडे नाचवून पंचनामे केले जायचे. त्यामुळे काय व्हायचे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुळात औरंगाबाद जिल्ह्यातील अंचलगावात हेही घडले नाही. ज्या शेतकºयाच्या शेतात हे पंचनामे झाले त्या शेतकºयाने अलीकडेच हा घोडा खरेदी केला होता. आपल्या घोड्यावर बसून ‘साहेब’ खूश झाले, तर पंचनाम्यात फायदाच होईल, हाही त्यामागचा स्वार्थ. पंचनाम्यासाठी आलेल्या दोन्ही साहेबांना या घोड्यावर बसविले. त्यांचे फोटो काढले. दुसºया दिवशीची सकाळ उजाडेपर्यंत दोघेही खूश. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल काय झाले आणि साहेबांची घोडेस्वारी मुंबईपर्यंत पोहोचली. शेतकºयाने आपला मोबाईल स्वीच आॅफ करून टाकला. इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिवसभर ब्रेकिंग लावून धरल्याने उपविभागीय अधिकाºयांनी नोटीस बजावली. तिकडे कृषिमंत्र्यांनीही चौकशी समिती नेमण्याची घोषणा करून बातम्यांमध्ये जागा मिळविली. नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांना हेलिकॉप्टर-विमान चालते, मग तलाठ्यांना घोडा का नाही... इथपासून ते शेतकºयांच्या जखमांवर अधिकाºयांनी घोड्यावर बसून मीठ चोळले... इथपर्यंत चर्चा झडल्या. प्रत्यक्ष वास्तव कोणीच समजून घेतले नाही.
 

Web Title:  What did that 'horse' hit with 'talent'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.