कामगारांचे कल्याणकत

By admin | Published: April 14, 2016 02:40 AM2016-04-14T02:40:45+5:302016-04-14T02:40:45+5:30

डॉ. आंबेडकरांनी देशातील श्रमिक वर्गाचा केलेला विचार पाहता असे लक्षात येते की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीच त्यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षामध्ये कामगारांच्या कल्याणाबाबत जशा तरतुदी

Welfare of workers | कामगारांचे कल्याणकत

कामगारांचे कल्याणकत

Next

- कॉम्रेड श्रीधर देशपांर्डे

डॉ. आंबेडकरांनी देशातील श्रमिक वर्गाचा केलेला विचार पाहता असे लक्षात येते की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीच त्यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षामध्ये कामगारांच्या कल्याणाबाबत जशा तरतुदी केल्या त्याच धर्तीवरील तरतुदी त्यांनी घटनेतही केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी कामगारांना युनियन स्थापन करण्याचा हक्क मूलभूत हक्क म्हणून दिला. या हक्कामुळे कामगार नोकरीत सेवाशर्ती, लाभ मिळवू शकतील हा त्यामागचा विचार. पण पुढे जाऊन बाबासाहेबांनी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कामाच्या ठिकाणी मानवतेवर आधारित वातावरण, चांगले जीवन जगण्यापुरते वेतन, महिलांना बाळंतपणाची रजा व सवलती, समान कामाला समान वेतन (पुरुष व स्त्रिया) इत्यादींचा समावेश करून ते कामगारांच्या बाजूने उभे राहिले. या सवलतीद्वारे कामगार वर्गाने आंदोलने व त्यागामधून देशभरात किमान वेतन, अ‍ॅप्रंटिसशिप कायदा, फॅक्टरी कायदा, बोनस, पेन्शन, ग्रॅच्युइटी इत्यादी कायदे तसेच औद्योगिक कला कायदा असे अनेक महत्त्वाचे कायदे मिळवले. परंतु नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर आल्याआल्याच या सर्व कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल करून कामगारांना गुलामगिरीत ढकलण्याचे काम सुरू केले आहे. मालकांना मात्र हायर अँड फायरद्वारे ७० टक्के कामगारांना काढून टाकण्यासाठी व कारखाने बंद करण्यासाठी अधिकार बहाल केले आहेत. आंबेडकर पुतळ्यांशी नाही तर पुस्तकांशी संबंधित आहेत.

Web Title: Welfare of workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.