चालता-बोलता संदर्भ ग्रंथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:10 AM2018-02-16T04:10:40+5:302018-02-16T04:10:52+5:30

पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ म्हणूनच आबासाहेब ऊर्फ अ‍ॅड. धनंजय माने ओळखले जातात...!

 Walking Reference Book! | चालता-बोलता संदर्भ ग्रंथ !

चालता-बोलता संदर्भ ग्रंथ !

googlenewsNext

- राजा माने

पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ म्हणूनच आबासाहेब ऊर्फ अ‍ॅड. धनंजय माने ओळखले जातात...!

अनेक माणसं आपल्याभोवती वावरत असतात. त्यांचं ‘वनमॅन आर्मी’ शैलीतील काम मात्र बºयाच वेळा आपल्या लक्षातही येत नाही. अशाच शैलीत सोलापूर जिल्ह्यात गेली चार तपं कार्यरत असलेलं नाव म्हणजे आबासाहेब तथा धनंजय एकनाथ माने!
वकिली व्यवसायात राहून स्वत:च्याच आचारसंहितेबरहुकूम जीवनाची वाटचाल करताना वाचन, अभिरुची संपन्नता आणि सामाजिक जबाबदारीचे भान कशा पद्धतीने राखले जाऊ शकते, याचे उदाहरण म्हणूनच आबासाहेबांकडे आज पाहिले जाते. वयाची सहासष्टी ओलांडलेल्या या माणसाने आपल्या ज्ञान व वाचनसमृद्धीच्या बळावर अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ ठरण्याचे आपसूक कार्य केले आहे.
राजकारण असो वा आंतरराष्टÑीय इतिहास, त्याचे सर्व संदर्भ त्यांना जणू तोंडपाठच! या गुणाला प्रेमळ आणि निरपेक्ष स्वभावाची जोड मिळाल्याने सर्वच क्षेत्रात त्यांच्यावर प्रेम करणारा खूप मोठा गोतावळा तयार झाल्याचा अनुभव आपल्याला येतो. करमाळा तालुक्यातील शेळगाव हे माने कुटुंबाचे मूळ गाव. शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुढे हे कुटुंब सोलापूरला स्थलांतरित झाले. सोलापूर नगरपालिका असताना १९६३-६४ साली त्यांचे पिताश्री अण्णासाहेब तथा अ‍ॅड. ए. तु. माने हे नगराध्यक्ष होते. वकिली आणि राजकारणात त्यांच्या नावाचा दबदबा होता. कडक शिस्तीचे आणि कल्पक असलेल्या अण्णासाहेबांनी त्या काळात सोलापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत व्हावे, असा ठरावही केला होता. वडिलांचा असा संपन्न वारसा लाभलेल्या आबासाहेबांचे शालेय शिक्षण दमाणी हायस्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालयात झाले. बी. एस्सी.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथूनच त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. कायदा विश्वात ते बॅ. शरदचंद्र बोस आणि कैलासनाथ काटजू यांना आपले गुरू मानतात. शिकत असतानाच त्यांचे वडील अण्णासाहेबांना कर्करोगाने ग्रासले अन् सर्वच कर्तव्यांची जबाबदारी आबासाहेबांवर येऊन पडली. ती जबाबदारी समर्थपणे सांभाळताना व्यवसायात सामाजिक मूल्य असणाºया खटल्यांमध्ये त्यांनी सदैव विशेष भूमिका बजावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गोरगरिबांच्या खटल्यांमध्ये विनामूल्य काम करण्याचे तत्त्व अंगीकारले.
१९७५ पासून सक्रिय झालेल्या अ‍ॅड. धनंजय माने यांच्याकडे आज चार हजारांहून अधिक ग्रंथसंपदा असलेले ग्रंथालय आहे. इंग्रजीसह विविध भाषांमधील अनेक संदर्भ संकलित करण्याचा त्यांना छंद आहे. माणूस मोठा होतो, त्यात समाजाचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे आपण केलेल्या कमाईचा ५० टक्के वाटा समाजाला दिला पाहिजे, या तत्त्वाचे ते समर्थक आहेत. त्याच कारणाने प्रसिद्धीपासून दूर ठेवून कॅन्सरग्रस्त तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी ते आर्थिक मदत करीत असतात. याच कार्यात त्यांची पत्नी सौ. रेखा, चिरंजीव अ‍ॅड. जयदीप, सून नेहा यांचा सहभाग असतो. त्यांच्या दोन्ही कन्या अभियंता असून, त्यापैकी गीतांजली साळोखे ही अमेरिकेत तर दीप्ती जाधव ही मुंबईत संशोधन करते आहे. जिल्ह्यातील पत्रकारांबरोबरच विविध क्षेत्रातील व्यक्तींचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ म्हणूनच आबासाहेबांकडे पाहिले जाते.

Web Title:  Walking Reference Book!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.