मुद्द्याची गोष्ट: पेट्रोलमध्ये १० ऐवजी २० टक्के इथेनॉल टाकणार, पण पेट्रोल स्वस्त होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 06:23 AM2022-06-12T06:23:16+5:302022-06-12T06:24:04+5:30

आपल्या वाहनावर नेमके काय परिणाम होतील, पेट्रोल स्वस्त होईल का यासह विविध घटकांचा घेतलेला आढावा...

The point is 20 percent ethanol will be added to petrol instead of 10 percent but will petrol become cheaper | मुद्द्याची गोष्ट: पेट्रोलमध्ये १० ऐवजी २० टक्के इथेनॉल टाकणार, पण पेट्रोल स्वस्त होणार का?

मुद्द्याची गोष्ट: पेट्रोलमध्ये १० ऐवजी २० टक्के इथेनॉल टाकणार, पण पेट्रोल स्वस्त होणार का?

googlenewsNext

चंद्रकांत दडस, उपसंपादक, मुंबई

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे भारतात सध्या अन्य इंधन पर्याय म्हणून इथेनॉलकडे पाहिले जात आहे. अलीकडेच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही लवकरच देशात इथेनॉलवर चालणारी वाहने धावण्याचे संकेत दिले आहेत. सध्या देशात १० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल वापरले जात असून, हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्याचे आपल्या वाहनावर नेमके काय परिणाम होतील, पेट्रोल स्वस्त होईल का यासह विविध घटकांचा घेतलेला आढावा...

इथेनॉल म्हणजे काय?
इथेनॉल इंधन हे इथाइल अल्कोहोल आहे. उसाच्या रसापासून, मळीपासून व खराब झालेल्या साखरेपासून इथेनॉल तयार करण्यात येते. याशिवाय बगॅस, कचरा, गटारीचे पाणी, सर्व कुजणाऱ्या पदार्थांपासून इथेनॉलनिर्मिती करता येते.

पेट्रोलला पर्याय आहे का?
वाहनांसाठी इंधन म्हणून इथेनॉल पूर्णपणे वापरता येईल. मात्र, त्यासाठी इंजिनामध्ये काही बदल करावे लागतील. मात्र, सध्याच्या पेट्रोलमध्ये ते मिसळून त्याचा प्रभावी वापरही शक्य आहे. इथेनॉलमध्ये ऑक्सिजन असल्याने, इंधनाचे संपूर्ण ज्वलन होते, परिणामी उत्सर्जन कमी होते.

पेट्रोल स्वस्त होईल का?
इथेनॉलची किंमत जवळपास ६१ रुपये प्रतिलिटर आहे. सध्याच्या महागड्या पेट्रोलमध्ये ते मिसळल्याने किंमत कमी होऊ शकते. मात्र, इथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. ग्राहक फक्त एक लिटर पेट्रोलसाठी पैसे देतो. इथेनॉलमिश्रित पेट्रोलची किंमत पेट्रोल आणि इतर घटकांवर अवलंबून असते. त्यासाठी पेट्रोल पंपावर स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल.

इंजिन बदलावे लागेल?
२० टक्के इथेनॉल मिश्रणासाठी वाहन कंपन्यांना वाहनांसाठी नवे इंजिन बसवावे लागेल. यामुळे वाहनांची किंमत वाढेल. अंदाजानुसार, चारचाकी वाहनांच्या किमती ३ हजार ते ५ हजार रुपयांनी तर दुचाकींच्या किमती १ हजार ते २ हजार रुपयांनी वाढू शकतात.

पाण्याच्या तक्रारीचे काय करायचे?
अनेक वाहनधारकांनी पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्याच्या तक्रारी केल्या आहेत. इथेनॉलमध्ये अतिशय नगण्य प्रमाणात पाणी असते. त्यामुळे ते कोणतेही नुकसान करत नाही. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्याची शक्यता नाहीशी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. पेट्रोलियम डिलर्सना तेल कंपन्यांनी इंधनासाठी दर्जा तपासणीचे पालन करण्यास सांगितले आहे.

शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळणार?
इथेनॉलच्या वाढत्या वापरामुळे साखर कारखान्यांनाही चांगला आर्थिक लाभ होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळणार आहेत. इंधन वापराचा नवा टप्पा ग्रीन हायड्रोजनचा आहे. यात प्रदूषणशून्य टक्के होते. ऑस्ट्रेलियामध्ये व्यापारी तत्त्वावर त्याचा वापरही सुरू झाला आहे.

इथेनॉलचे वाहनासाठी तोटे काय?
पेट्रोलच्या तुलनेत कमी ऊर्जा-कार्यक्षम आहे. केवळ इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनाची इंधन कार्यक्षमता पेट्रोलच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के कमी असते.
ग्राहकांना इथेनॉल वापरताना गाडीच्या टाक्या अधिक वेळा भरावी लागतील त्याच्यासाठी खर्च वाढू शकतो.

१९९२मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये करण्याचे धोरण देशात स्वीकारले गेले.
१९९८मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने ५% इथेनॉलचा पेट्रोलमध्ये सक्तीने वापर सुरू केला
टीव्हीएस, बजाज या कंपन्यांकडून पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती

Web Title: The point is 20 percent ethanol will be added to petrol instead of 10 percent but will petrol become cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.