पुरुषी दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 04:47 AM2017-09-02T04:47:51+5:302017-09-02T04:48:14+5:30

मुलगी झाल्याने पती आपणास नांदवणारच नाही, म्हणून नवजात अर्भकाला जिवंतपणे मातीत पुरण्याचा निर्णय घेणा-या मातेचे काळीज कसले असेल? असा प्रश्न आपणास पडू शकतो.

Men panic | पुरुषी दहशत

पुरुषी दहशत

Next

मुलगी झाल्याने पती आपणास नांदवणारच नाही, म्हणून नवजात अर्भकाला जिवंतपणे मातीत पुरण्याचा निर्णय घेणा-या मातेचे काळीज कसले असेल? असा प्रश्न आपणास पडू शकतो. मात्र, मुलगी झाल्याने पतीची दहशत इतकी वाढणार आहे की, तो कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, नांदवणार नाही, संपूर्ण आयुष्य परितक्त्या म्हणून जीवन कंठावे लागेल या भीतीने गर्भगळीत झालेली माता स्वत:च्या पोटच्या पोराचा जीव घेण्याचा निर्णय घेते. कोल्हापूरजवळ गडमुडशिंगी येथे ही घटना घडली. लखन मोरे नावाच्या सेंट्रिंगचे काम करणाºया महापुरुषाला मुलगा हवा आहे. त्याचा हा दुसरा विवाह आहे. पहिल्या पत्नीपासून चार मुली झाल्या आहेत. एक या दो बस, असा प्रचार करणाºया आपल्या समाजात मुलगाच हवा यासाठी चार मुलींना जन्म दिला गेला. त्या पहिल्या पत्नीचाही त्यासाठी छळ करण्यात आला. तिच्याकडून आपल्याला मुलीच होणार असा समज करून घेऊन दुसरे लग्न केले. तिच्याकडून मुलाचीच अपेक्षा होती. वास्तविक मुलगा किंवा मुलगी होण्यास पुरुषाचीच जनुके जबाबदार असतात, हे वैज्ञानिक सत्य आहे. सारिका मोरे हिलासुद्धा मुलगीच होते, कारण लखन मोरेची जनुके त्या प्रकारची आहेत. मात्र, आजही स्त्रियांना मुलगी होण्याने आरोपीच्या पिंजºयात उभे केले जाते. या देशातील पुरुषांची ही दहशत मोडून काढण्यासाठी त्याचा जन्म कसा झाला, याची शिकवण द्यायला हवी. आपण एकविसाव्या शतकातही मुलगा किंवा मुलगी कशी होते, याचे साधे ज्ञान सर्वसामान्य लोकांना देऊ शकत नाही. मुळात मुलगा किंवा मुलगी हा भेद करायला नको आहे. त्यातून संपूर्ण समाजाचा नैसर्गिक समतोलच बिघडत चालला आहे. स्त्रियांना देवी, माता, भगिनी वगैरे वगैरे मानणाºया या पुरुषांची ही दहशत मोडून काढायला हवी. सारिका मोरे हिला माहीत होते की, त्याने आपल्याशी केलेला विवाह केवळ मुलगा जन्माला घालावा यासाठीच आहे. तोच उद्देश साध्य झाला नाही तर या विवाहाची गरज नाही म्हणून त्याने २६ वर्षांच्या सारिकाला सोडून दिले असते. वास्तविक पहिला विवाह आणि चार मुली असताना हा विवाहच व्हायला नको होता. हा दुसरा विवाह कायदेशीर आहे का याचीच खातरजमा करून एक पत्नी असताना त्याने दुसरे लग्न केले असेल किंवा तिच्यापासून रीतसर घटस्फोट न घेता हे लग्न केले असेल, तर त्यासाठीही लखन मोरे याला आरोपीच्या पिंजºयात उभे केले पाहिजे. इतके कौटुंबिक कायदे असतानाही हा नादान पुरुष केवळ मुलगा हवा यासाठी ही दहशत निर्माण करतो आहे.

Web Title: Men panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.