नव्या नात्यांचं महाभारत!

By सचिन जवळकोटे | Published: November 30, 2017 12:25 AM2017-11-30T00:25:01+5:302017-11-30T00:25:20+5:30

पिंटकरावांचा टीव्ही रात्री अकरानंतर म्हणे भलत्याच गमती-जमती करायचा. एखाद्या चॅनेलची स्टोरी रंगात आलेली असताना दुसºया चॅनेलची दृश्यं म्हणे ‘क्रॉस कनेक्शन’ व्हायची. काल डुलत-डुलत आल्यानंतर रात्री पिंटकरावांनी टीव्ही सुरू केला.

 Mahabharata of new relationships! | नव्या नात्यांचं महाभारत!

नव्या नात्यांचं महाभारत!

Next

पिंटकरावांचा टीव्ही रात्री अकरानंतर म्हणे भलत्याच गमती-जमती करायचा. एखाद्या चॅनेलची स्टोरी रंगात आलेली असताना दुसºया चॅनेलची दृश्यं म्हणे ‘क्रॉस कनेक्शन’ व्हायची. काल डुलत-डुलत आल्यानंतर रात्री पिंटकरावांनी टीव्ही सुरू केला. समोरच्या चॅनेलवरील महाभारतात अर्जुनाला कृष्ण उपदेश करत होता. एवढ्यात दुसºया चॅनेलच्या बातम्या महाभारतात घुसल्या.
थोरले काका बारामतीकर भाषण करत होते, ‘उद्धव म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा...’ हे ऐकून महाभारतातली पात्रंही गोंधळली. भीष्मानं अर्जुनाला मिठी मारली; मात्र दचकलेल्या अर्जुनानं आपली पाठ चाचपली. सुदैवानं कोठेही खंजिराचा वार आढळला नाही. एवढ्यात ‘न्यूज चॅनेल’वर ‘उठसूट खळ्ळऽऽ खट्याककर’ अन् ‘उठसूट कविताकर’ या दोघांची भेट झाल्याची ब्रेकिंग फिरू लागली. दरम्यान, बारामती ते सातारा वडाप सेवा सुरू केल्याची माहिती थोरल्या बारामतीकरांनी दिली. जाताना साताºयाचे राजे तर येताना फलटणचे राजे, अशा पद्धतीनं सिटांचं बुकिंग केलं. तेव्हा महाभारताच्या चक्रव्यूहात शिरलेल्या अभिमन्यूला गुरुवर्य द्र्रोणांनी चक्क आपल्या रथात बसविलं. कृष्णानंही आपल्या रथाकडं दुर्योधनाला बोलविलं.
हे पाहून महाभारताचं वर्णन करणारा संजयही गडबडला. रोज एका नव्या भूमिकेत शिरणाºया बारामतीकरांची नवी रूपं पाहून धृतराष्ट्रही गोंधळला. सकाळी बाबा महाराज कराडकर यांना चहाला बोलाविणारे बारामतीकर दुपारी देवेंद्र पंत नागपूरकर यांच्यासोबत लंचला बसले. संध्याकाळची टी पार्टी ‘मातोश्री’करांसोबत झाल्यानंतर रात्रीचं डिनर ‘नमो नमो’सोबत कसं करता येईल, याचे आडाखे बांधू लागले. हे पाहून धाकले बारामतीकर खूश झाले.
मात्र पुन्हा महाभारताचं चॅनेल सुरू झालं. पुत्रप्रेमानं कासावीस झालेले धृतराष्ट्र आपल्या पुतण्याकडे बघायलाही तयार नव्हते. हे पाहताच मात्र पिंटकरावांची धुंदी पूर्णपणे उतरली. ‘शत्रूला मित्राचा मुलगा’ म्हणणारे बारामतीकर स्वत:च्या पुतण्यावर किती माया करतात, हे पाहण्यासाठी २०१९ पर्यंत आपल्याला टीव्ही सुरू ठेवूनच समोर बसावं लागेल, हे पिंटकरावांच्या लक्षात आलं.
 (sachin.javalkote@lokmat.com) 

Web Title:  Mahabharata of new relationships!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या