भाष्य - शिकलेले शहाणे (?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:17 AM2017-09-13T00:17:35+5:302017-09-13T00:17:35+5:30

हवामान खात्याच्या माजी संचालक मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणावर समाजातून ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यातील काही मोजका अपवाद वगळता खरोखरच चिंताजनक आहेत. आपल्या समाजाचे बौद्धिक वय काय हा प्रश्न उपस्थित करणा-या आहेत. मुळात एखाद्या शास्त्रज्ञ महिलेने अशाप्रकारे सोवळेओवळे पाळावे हाच अयोग्य प्रकार आहे.

learned learned (?) | भाष्य - शिकलेले शहाणे (?)

भाष्य - शिकलेले शहाणे (?)

Next

हवामान खात्याच्या माजी संचालक मेधा खोले यांच्या सोवळे प्रकरणावर समाजातून ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यातील काही मोजका अपवाद वगळता खरोखरच चिंताजनक आहेत. आपल्या समाजाचे बौद्धिक वय काय हा प्रश्न उपस्थित करणा-या आहेत. मुळात एखाद्या शास्त्रज्ञ महिलेने अशाप्रकारे सोवळेओवळे पाळावे हाच अयोग्य प्रकार आहे. त्यांच्या घरात त्यांना त्यांच्या सर्व प्रथा पाळण्याचा अधिकार असला तरीही समाजाला आदर्श ठरू शकतील अशा व्यक्तींनी आपले सार्वजनिक व खासगी वर्तनही आदर्श ठेवणे अपेक्षित असते. समाज त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहत असतो. जसे अमिताभ बच्चनने एखाद्या मंदिरातील नंदीच्या कानात जाऊन सांगणे अयोग्य आहे तसेच खोलेबार्इंनी आपला पूजेचा स्वयंपाक सोवळ्यातून झाला पाहिजे असा आग्रह धरणे अयोग्यच आहे. या घटनेची एक बाजू ही तर दुसरी बाजू पोलिसांची. पाकीटमारी, साखळीचोरी अशा प्रकारचे गुन्हे नोंदवून न घेता परस्पर मिटवण्याकडे पोलिसांचा कल असतो. तरीही मेधा खोले यांनी केलेली तक्रार त्यांना इतकी महत्त्वाची का वाटावी असा प्रश्न यातून निर्माण होत आहे. त्यांच्यावर दबाव आणला गेला, खोलेबार्इंनी तो आणला असे सांगण्यात येत आहे. त्यात तथ्यांशही दिसतो आहे, मात्र तरीही पोलीस अशा दबावाला का बळी पडले हे शिल्लक उरतेच! त्यांनीच शहापणाने ‘हा तुमचा घरगुती मामला आहे, तो घरातच मिटवा, आम्ही त्यात पडणार नाही’ असे ठामपणे सांगितले असते तर इतके काही घडते ना! अधिक चितेंची बाब ही की तक्रार दाखल झाल्यानंतर समाजातून त्यावर झालेले चर्वितचर्वण! ते मूळ घटनेपेक्षाही चिंताजनक आहे. कोणी निर्मला यादव (या घटनेतील दुस-या महिला) यांच्या बाजूने तर कोणी खोले यांच्या. कोणी वैयक्तिक हक्क कसा महत्त्वाचा तर कोणी समाजाची मानहानी झाली म्हणून आक्रमक. काहींनी तर राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्नही केला. सोशल मीडियावरचा धुमाकूळ तर विचारूच नका. त्यातून समाजाला हानीकारक असे काही घडू शकते हेच त्यावरच्या लेखकरावांच्या गावी नाही. अनेकांनी तर थेट चारित्र्यहननाचाही प्रयत्न केला. तरी बरे आता असे प्रकार गुन्हा समजला जाणार आहेत. समाज शिकला म्हणजे शहाणा झाला असे नाही हेच यातून दिसून आले.

Web Title: learned learned (?)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.