बिदागीचे कीर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:29 AM2018-01-05T00:29:26+5:302018-01-05T00:30:03+5:30

‘श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!’ भागवतात सांगितल्याप्रमाणे या नऊ भक्तीपैंकी एक म्हणजे कीर्तन. आधी ब-याचअंशी आध्यात्मिक अंगाने जाणारे हे कीर्तन बदलत्या सामाजिक संदर्भांच्या काळात प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम झाले आणि आज तर ते उपजीविकेचेही साधन झाले आहे.

 Baddagi Keertan | बिदागीचे कीर्तन

बिदागीचे कीर्तन

googlenewsNext

‘श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!’ भागवतात सांगितल्याप्रमाणे या नऊ भक्तीपैंकी एक म्हणजे कीर्तन. आधी ब-याचअंशी आध्यात्मिक अंगाने जाणारे हे कीर्तन बदलत्या सामाजिक संदर्भांच्या काळात प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम झाले आणि आज तर ते उपजीविकेचेही साधन झाले आहे. प्रश्न उपजीविकेचा आहे त्यामुळे कीर्तनाचे पारिश्रमिक रोख रकमेत मोजणे अपरिहार्य आहे. परंतु कीर्तनकारांनी कायम दान-धर्माच्याच भूमिकेतून कीर्तन करावे, अशी जी धारणा तयार झाली आहे तिची दुसरी बाजू समजून घ्यायची कुणाचीच तयारी नाही. म्हणूनच परवा नागपुरात राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव आयोजन समितीच्या पत्रकार परिषदेत आयोजकांनी मानधनाच्या विषयावरून विदर्भातील कीर्तनकारांवर टीका केली. अशी टीका करतानाच आम्ही जे विषय कीर्तनकारांना देतो त्यात वैदर्भीय कीर्तनकार कमी पडत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. या कीर्तन महोत्सवात दरवेळी पुण्याकडचीच नावे का दिसतात, हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना आयोजकांनी वैदर्भीय कीर्तनकारांच्या क्षमते आणि प्रतिभेवरच असे धक्कादायक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण, यात किती तथ्य आहे हे त्यांनी सप्रमाण सांगितले नाही. प्रत्येकाची क्षमता आणि प्रतिभा सारखी नसते. त्यानुसार बिदागीचा आकडाही कमी-जास्त असणे स्वाभाविक आहे. पण, म्हणून सरसकट एकूणच वैदर्भीय कीर्तनाच्या परंपरेलाच आरोपीच्या पिंज-यात उभे करून त्या परंपरेचे मोजमाप पैशांच्या तराजूत करणे समजण्या पलीकडचे आहे. तो कलावंत असेल किंवा कीर्तनकार मानधन हा त्याचा सन्मान आहे. सन्मान मागून मिळत नसतो हे मान्य. पण, जो जितक्या सन्मानाचा हकदार आहे त्याला तो न मागता कसा मिळेल, हे बघणे आयोजक म्हणून आपली जबाबदारी नाही का? प्रश्न कीर्तनामागच्या ‘उद्देशा’चा आहे. त्या उद्देशाच्या चौकटीत इतर कीर्तनकार बसत नसतील तर त्यांच्या नावांना तशा थेट नकार देणे असहिष्णूता ठरेल. परिणामी बिदागीचे कारण पुढे करून वैदर्भीय कीर्तनकारांची ‘किंमत’ समोर आणली जात आहे. पुण्याच्या कीर्तनकारांचा प्रवासखर्च, निवासखर्च आणि बिदागी ही विदर्भातल्या कीर्तनकारांपेक्षा खरच जास्त असेल का, हे न समजण्याइतपत इथे कुणीही भोळे नाही. त्यामुळे वैदर्भीय कीर्तनकारांचा वैचारिक झंझावात झेपत नसेल तर त्यांना नका बोलावू. पण, त्यांना नाकारायचे म्हणून असे ‘बिदागीचे कीर्तन’ जगासमोर केले जाऊ नये इतकेच.

Web Title:  Baddagi Keertan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.