दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 07:06 AM2018-08-28T07:06:56+5:302018-08-28T07:07:18+5:30

निसर्गाची एक मोठी विस्मयकारक रचना आहे़ या रचनेची ही विषेषता आहे की, ती नियमाने बांधील आहे़ ही सृष्टी व्यवस्थित रूपाने चालावी याकरिता निसर्गाने प्रत्येक ठिकाणी नियम बनविलेले आहे़

Accident | दुर्घटना

दुर्घटना

Next

निसर्गाची एक मोठी विस्मयकारक रचना आहे़ या रचनेची ही विषेषता आहे की, ती नियमाने बांधील आहे़ ही सृष्टी व्यवस्थित रूपाने चालावी याकरिता निसर्गाने प्रत्येक ठिकाणी नियम बनविलेले आहे़ या नियमांचा शोध घेऊन विज्ञानाने निसर्गाच्या लुप्त असलेल्या अनेक रहस्यांची उकल केलेली असून त्याच आधारावर मानवाने सुध्दा अनेक नियम बनविलेले आहेत.

जशी निसर्ग नियमानुसार सृष्टी चालत असते, त्याचप्रमाणे मानवाने तयार केलेल्या नियमानुसार हे जीवन आणि समाज चालत असतो. जेव्हा या नियमांचे उल्लंघन होत असते, तेव्हा रचना विस्कळीत होऊन दुर्घटना घडत असते. जेव्हा समाजामधील आरोग्याचे नियम विस्कळीत होत असतात, तेव्हा शारीरिक आणि मानसिक रोगांची उत्पत्ती होत असते. जेव्हा नैतिकतेचे नियम विस्कळीत होत असतात, तेव्हा समाजामध्ये भेदभाव वाढत असतो़ आर्थिक नियमांचे उल्लंघन होणे ही या गोष्टीची साक्ष आहे की, समाजामध्ये आर्थिक गुन्हे/अपराध वाढलेले आहेत़ तसेच रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजेच दुर्घटनेला निमंत्रण देणे होय.़ रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या दुर्घटना, भारतवर्षाकरिता फारच चिंताजनक अशी बाब आहे़ संपूर्ण भारतवर्षामध्ये एका वर्षात १ लक्ष ४० हजार लोक दुुर्घटनांमध्ये मृत्यू पावतात. केवळ महाराष्टÑ राज्यामध्ये रहदारींचे उल्लंघन करून मृत पावणाºयांची संख्या ३३,००० पेक्षा जास्त आहे़ इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्घटनांमध्ये मृत पावणाºया लोकांची संख्या फक्त भारतामध्येच आहे़ दुर्घटना घडण्याचे मुख्य कारण वाहन चालकांची चूक होय़ आपल्या देशामध्ये ७० ते ८० टक्के दुर्घटना या वाहनचालकांच्या चुकांमुळे घडत असतात़ सदर दु:खद दुर्घटना घडण्यामध्ये १६ ते ३५ वर्षे वय असलेल्या व्यक्तींचा सर्वात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. जो वर्ग देश, समाज आणि परिवाराचा आधार आहे, तोच या दुर्घटनेचा शिकार होत आहे़ अशा प्रकारच्या दुर्घटनांना थांबविण्याचे काम हे प्रशासनाचे तर आहेच़ परंतु सामान्य जनतेच्या सक्रिय सहयोगाशिवाय हे काम पूर्णत्वास नेणे शक्य नाही़ याचा प्रारंभ आम्ही शिकत असलेल्या शाळेतून/विद्यालयातून व्हावयास पाहिजे़ पालकांची भूमिकासुध्दा यादृष्टीने फार महत्त्वाची आहे़ पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांना समजावण्यापासून, स्वत: नियमांचे पालन करणे जरुरीचे आहे़ त्यामुळे दुर्घटनांना आळा बसण्यास फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडेल़ अशा प्रकारे दुर्घटनांमुळे होणाºया मृत्यूंंना थांबवून आम्ही कधीही न भरल्या जाऊ शकणाºया नुकसानीला आळा घालू शकतो़

 - डॉ़ भूषण कुमार उपाध्याय

Web Title: Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.