जुन्या इमारतीचे भाग्य कधी उजाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:33 AM2019-05-20T11:33:33+5:302019-05-20T11:35:21+5:30

महापालिका : महापुरूषाच्या चबुतयासमोर अवस्वच्छता; गरीबांच्या निवासस्थानासह मद्यपींचा अड्डा 

When will the fate of the old building ever be shaken? | जुन्या इमारतीचे भाग्य कधी उजाळणार

जुन्या इमारतीवर झाडांनी मूळ धरले आहे. 

Next

धुळे : मनपाच्या जुन्या इमारत परिसरातील  गटारी तुबंल्या, पाण्याची गैरसोय, पथदिवे बंद, महागडे साहित्य पडले धुडखात अशा विविध समस्यांचे माहेरघर असलेली जुन्या इमारतीत दुरूस्तीसह मुलभुत सोयी-सुविधा पुरवुन कायापालट करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे़ 
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महापालिकेने गेल्या चार वर्षात केलेल्या कार्यवाहीवर आता महापालिकेला गुणांकन दिले जाणार आहे़ शिवाय त्यावरच आयुक्तांचा ‘केआरए’ देखील ठरणार आहे़ यावर्षी जाहीर केलेल्या  अहवालात मनपाला स्वच्छ भारत अभियानात यश मिळविता आलेले नाही़  स्वच्छतेसह  इमारतीची रंगरंगोटी स्वच्छतागृह, शौचालय, इमारतीतील व्हरांड्यांची स्वच्छता करून मुलभुत प्रश्न सोडविण्याची गरज आहे़ 
स्वच्छता सुविधांचा अभाव
स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध सरकारी आणि महापालिका कार्यालय व इमारतीत राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात गेल्यावर्षी महापालिकेला यश मिळविता आले होते़ शहरासह जुन्या इमारतीतच घाणीच्या साम्राज्याला सामोरे जावे लागत आहे़ शौचालयाची दुरावस्था, इमारतीच्या व्हरांडात गुटखा खाऊन थुंकल्याने इमारतीच्या भिंती रंगल्या आहेत़  
रजिस्टर विभागातबाहेर कचरा
इमारतीच्या दुसºया मजल्यावरील जन्म- नोंदणी रजिस्टर विभागात मौल्यवान कागदपत्राचा दस्तावेज आहे़ प्रशासनाने सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याही प्रकारची उपाय-योजना केलेली नाही़ कर्मचाºयांकडून नियमित स्वच्छता होते नाही़ त्यामुळे  अनेक महिन्यापासुन कार्यालयाबाहेर कचरा तसाच पडून आहे़ 
मद्यपींचा अड्डा
सुरक्षा रक्षक नसल्याने इमारतीची सुरक्षा वाºयावर आहे़ त्यामुळे  ही इमारत गरीबांचे निवासस्थान झाले आहे़ मागील बाजुला रात्री दारूडे दारू पिवुन दारूच्या बाटल्या याच ठिकाणी फेकतात़ त्यामुळे महापालिकेची जुनी इमारत दारूचा अड्डा झाली आहे़ 
आरोग्य धोक्यात 
महापालिकेचे स्थलातर झाल्याने या इमारतीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे खुर्च्या, पंखे, जनरेटर, पथदिवे, फॅर्निचर तसेच अन्य महागडे साहित्य पडून खराब होत आहे़ ठिक-ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे़ 

*इमारतीवर झाडांनी वेढली  *पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय
*फ्रिजर अनेक वर्षापासुन बंदावस्थेत  *नळ गळतीव्दारे पाण्याची नासाडी
* विजपुरवठा करणारे जनरेटर बंदावस्थेत   *दारूच्या बाटल्या पडलेल्या 
*गटारीचे सांडपाणी इमारतीच्या आवारात  *खाजगी वाहनाची पार्कीग 
*सोलर पथदिवे बंद  *स्वच्छतागृह परिसरात दुर्गंधी
*मोकाट कुत्र्यांचा वावर 

Web Title: When will the fate of the old building ever be shaken?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे