धुळ्यात ट्रकच्या कॅबिनमध्ये तरुणाचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 04:18 PM2017-12-10T16:18:51+5:302017-12-10T16:20:19+5:30

चाळीसगाव रोड : शवविच्छेदनानंतर चित्र स्पष्ट

In the truck cabin of Dhule, | धुळ्यात ट्रकच्या कॅबिनमध्ये तरुणाचा गळफास

धुळ्यात ट्रकच्या कॅबिनमध्ये तरुणाचा गळफास

Next
ठळक मुद्देट्रकच्या कॅबिनमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन अहवालानंतर होणार चित्र स्पष्टचाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महामार्गालगत चाळीसगाव रोडवर एका ट्रकच्या कॅबिनमध्ये तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळला़ ही घटना रविवारी सकाळी उजेडात आली़ 
शहरालगत असलेल्या चाळीसगाव रोडवरील चौफुलीजवळ हॉटेल कुणालच्यामागे काशिनाथ ट्रान्सपोर्ट आहे़ या ट्रान्सपोर्टच्या समोरील आवारात ट्रक टँकरची ट्रॉली दुरुस्ती करणाºया २२ वर्षीय प्रविण उर्फ बबलू उचाळे (रा़ मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराच्या मागे, उचाळे वस्ती) या युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे़ ही घटना शनिवारी रात्री घडली असून रविवारी सकाळी ही बाब लक्षात आली़ 
याबाबत मृताच्या नातेवाईकांनी या युवकाचा घातपात झाल्याचा आरोप केला आहे़ चौकशी करुन खुनाचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी केली आहे़ घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते़ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे़ युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला आहे़ शवविच्छेदन झाल्यानंतर प्राथमिक अहवाल डॉक्टर सादर करतील़ त्यानंतरच गळफास घेवून आत्महत्या आहे की खून झाला आहे, हे स्पष्ट होईल़ असे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी सांगितले़ दरम्यान, या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे़ 

Web Title: In the truck cabin of Dhule,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.