विद्यार्थी शिष्यवृत्ती घोटाळ्यातील संशयित महिला आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 11:15 PM2017-02-17T23:15:01+5:302017-02-17T23:15:01+5:30

तळोदा पोलिसांची कारवाई : 24 फेब्रुवारीर्पयत कोठडी

Suspected woman accused in student scholarship scandal arrested | विद्यार्थी शिष्यवृत्ती घोटाळ्यातील संशयित महिला आरोपीस अटक

विद्यार्थी शिष्यवृत्ती घोटाळ्यातील संशयित महिला आरोपीस अटक

Next

तळोदा : एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प कार्यालयातील आठ कोटी 89 लाख 37 हजार 50 रुपये अपहार प्रकरणी आणखी एका महिला आरोपीला पोलीसांनी अटक केली आह़े अटकेतील आरोपींची संख्या आठ झाली आह़े
 शिष्यवृत्ती अपहार प्रकारणात तुळजा भवानी महिला मंडळ आष्टी जि़ बीड या महिला मंडळाला  6 कोटी 42 लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली आह़े या महिला मंडळाच्या अध्यक्षा असलेली महिला नालंदा बलभीम    खाडे या महिलेचा पोलीस शोध घेत होत़े दरम्यान      नालंदा खाडे हिला आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर येथील पोलीसांनी तिथल्या एका गुन्ह्यासंदर्भात अटक केली     होती़
या प्रकरणाचे तपासाधिकारी पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी सोलापूर येथील आर्थिक गुन्हे शाखेसोबत संपर्क करून नालंदा खाडे यांना ताब्यात देण्याबाबत चर्चा केली होती़ यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून नालंदा खाडे हिला तळोदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल़े 
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांच्या आदेशान्वये या गुन्ह्याचे तपासाधिकारी पोलीस निरीक्षक संजय भामरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुरेखाबाई पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र बोराळे, संजय सूर्यवंशी यांच्या तपास पथकाने केली़ (वार्ताहर)
अटकेतील नालंदा खाडे या महिलेला तळोदा पोलिसांनी तळोदा न्यायालयात हजर केले असता 24 फेब्रुवारी र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े
4राज्यभर गाजलेल्या तळोदा प्रकल्प कार्यालय शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणातील तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांच्यासह दीपचंद पाटील, दिनेश कोळी, संगीता दळवी, हिराबाई पाटील, विष्णू दळवी, मगन वळवी आदी सात आरोपी अटकेत आहेत़ या प्रकरणातील नालंदा खाडे या आठव्या आरोपीला अटक करण्यात आले आह़े
4 या प्रकरणातील महिला आरोपी कमलाबाई मधुकर दळवी या मयत झाल्याची माहिती आह़े तळोदा पोलीस ठाण्यात ऑक्टोबर 2015 मध्ये शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

Web Title: Suspected woman accused in student scholarship scandal arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.