शासनाच्या स्पर्धा परीक्षा विषयक धोरणाच्या विरोधात धुळ्यात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:09 PM2018-02-12T13:09:31+5:302018-02-12T13:10:30+5:30

५०० विद्यार्थ्यांचा सहभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या

Students' silent rally in Dhule in protest against the competition competition policy of the government | शासनाच्या स्पर्धा परीक्षा विषयक धोरणाच्या विरोधात धुळ्यात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

शासनाच्या स्पर्धा परीक्षा विषयक धोरणाच्या विरोधात धुळ्यात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

Next
ठळक मुद्देसकाळी ११ वाजता मोर्चाला सुरवातमोर्चेकºयांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्यामागण्यांचे निवेदन अधिकाºयांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शासनाच्या स्पर्धा परीक्षा विषयक धोरणाच्या विरोधात धुळ्यात आज विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. 
विद्यार्थी मोर्चा समन्वय समिती, डीटीएड,बी.एड स्टुडंट असोसिएशन व पोलीस बॉईज गृप यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला. 
सकाळी ११ वाजता कामगार कल्याण भवन येथून मोर्चाला सुरवात झाली. शिवतीर्थ, सार्वजनिक बांधकाम भवन, जुने सिव्हील रूग्णालय, कमलाबाई कन्या शाळेमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 
मोर्चेकºयांचा ठिय्या
मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या मांडल्याने, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम हुलवळे यांना आपल्या दालनापर्यंत पायीच जावे लागले.
विविध मागण्या
यावेळी मोर्चेकºयांनी विविध मागण्या केल्यात. त्यात पोलीस भरतीच्या पदसंख्येत वाढ करावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त परीक्षा रद्द करून, पूर्वीप्रमाणेच सहायक विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात यावी, बायोमेट्रीक्स पद्धतीचा वापर करºयात यावा, स्पर्धा परीक्षेसाठी तामिळनाडू पॅटर्नची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे.
मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी श्याम पाटील, सचिन बोरसे, विवेक पाटील, हेमंत पाटील, शशिकांत सोनवणे, सचिन पाटील, नीलेश पाटील, अमोल नगराळे यांच्यासह सुमारे ५०० विद्यार्थी  उपस्थित होते. 


 

Web Title: Students' silent rally in Dhule in protest against the competition competition policy of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.