गोवर-रूबेला लसीकरणात धुळे जिल्हा राज्यात दहाव्यास्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 11:55 AM2018-12-20T11:55:50+5:302018-12-20T11:57:24+5:30

आतापर्यंत साडेतीन लाख बालकांना दिली लस

In the state of Maharashtra, 10% | गोवर-रूबेला लसीकरणात धुळे जिल्हा राज्यात दहाव्यास्थानी

गोवर-रूबेला लसीकरणात धुळे जिल्हा राज्यात दहाव्यास्थानी

Next
ठळक मुद्देलसीकरणात भंडारा जिल्हा अव्वलसर्वात कमी लसीकरण जालना जिल्ह्यात३१ डिसेंबरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता

आॅनलाइन लोकमत
धुळे : गोवर,रूबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी  राष्टÑीय उपक्रमांर्तगत धुळे जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेस सुरूवात झालेली आहे. आतापर्यंत  जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २७५ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आलेली आहे. लसीकरणाच्या बाबतीत धुळे जिल्हा राज्यात दहाव्यास्थानी आहे. लसीकरणात राज्यात अव्वलस्थानी भंडारा जिल्हा असून, सर्वात कमी लसीकरण जालना जिल्ह्यात झालेले आहे. ही स्थिती १८ डिसेंबर १८पर्यंतची आहे.
धुळे जिल्ह्यात २७ नोव्हेंबर १८पासून लसीकरणाच्या मोहिमेस सुरूवात झालेली आहे.  ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालक, विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आहे.
जिल्ह्यातील २००२  खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा, तसेच १९४२ अंगणवाड्यांमधील बालकांना ही लस देण्यात येत आहे. लस देण्यासाठी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर अशा चौघांची एक टीम तयार करण्यात आलेली असून, जिल्ह्यात अशा एकूण ४ हजार ९७ टीम तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 
जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थितीत या लसीकरण मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला होता. 
जिल्ह्यासाठी ६ लाख ७२ हजार लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यातून  ५ लाख २३ हजार १४३ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून, १८ डिसेंबर १८ अखेरपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २७५ बालकांना लसीकरण करण्यात आलेले आहे. लसीकरणाची ही टक्केवारी ६७ टक्के असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली. 
३१ डिसेंबरपर्यंत मोहीम पूर्ण होणार
 जिल्ह्यात आता फक्त १ लाख ७३ हजार ८६८ बालकांना लस देण्याचे बाकी असून, ३१ डिसेंबरपर्यंत सर्व बालकांना लस दिली जाईल असेही सांगण्यात आले. 
लसीकरणासाठी कुठेच विरोध नाही
लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर सोशल मीडीयावरून पसरलेल्या अफवांमुळे काही ठिकाणी या लसीकरणास विरोध झाला होता. धुळे जिल्हयात एक-दोन ठिकाणी किरकोळ विरोध झाला होता. मात्र आरोग्य विभागातील कर्मचाºयांनी पालकांना या लसीकरणाचे महत्व पटवून दिल्याने, तो विरोधही मावळला. त्यामुळे अपवादात्मक एक-दोन ठिकाणे वगळता जिल्ह्यात लसीकरणासाठी कुठेच विरोध झाला नाही. 
धुळे जिल्हा राज्यात दहाव्या स्थानी
राज्यात एकाच दिवशी सर्वत्र या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झालेला होता. मात्र १८ डिसेंबर १८ अखेरपर्यंत  या मोहिमेत भंडारा जिल्हा अव्वलस्थानी आहे. या जिल्ह्यातील २ लाख ६५ हजार ८४२ पैकी २ लाख ३१ हजार ८५३ बालकांना लस देण्यात आलेली असून, लसीकरणाची टक्केवारी ८७ टक्के आहे. तर सर्वात कमी लसीकरण जालना जिल्ह्यात झालेले आहे.  या जिल्ह्यात ६ लाख १५ हजार ८२ पैकी फक्त २ लाख ९७ हजार ५८३ बालकांना, विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आलेले आहे. लसीकरणाची टक्केवारी केवळ ४८ टक्के आहे. 


 

Web Title: In the state of Maharashtra, 10%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे