शिव खट्याळ येथे तलाव खोलीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:38 AM2019-04-19T11:38:53+5:302019-04-19T11:40:30+5:30

मंजु गुप्ता फाऊंडेशनचा उपक्रम : उपक्रमांतर्गत ५७० शेतकºयांच्या जमिनीचे सपाटीकरण

Start of opening the lake at Shiv Khatyal | शिव खट्याळ येथे तलाव खोलीकरणास प्रारंभ

dhule

Next
ठळक मुद्देमंजु गुप्ता फाऊंडेशनचा उपक्रम : उपक्रमांतर्गत ५७० शेतकयांच्या जमिनीचे सपाटीकरण

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील शिव खट्याळ येथे देशबंधु मंजुगुप्ता फाऊंडेशनच्या माध्यमातून तलाव खोलीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. साक्री तालुक्यातील गावांमध्ये गरीब कुटुंबाचे जीवनमान उंचावण्याचे काम मागील आठ वषार्पासनू सुरु आहे. यामध्ये कुटुंब विकासाचे विविध उपक्रम राबववले जात आहेत. यामधील जमीन सपाटीकरण हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रामुख्याने ज्या गरीब शेतकयांची पडीत जमीन आहे ती लागवडीखाली करण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबववला जातो. यार्वी या उपपक्रमांतर्गत ५७० शेतकºयांचे प्रत्येकी कमीतकमी अर्धा एकर जमीन सपाटीकरणाचे काम करण्यात आले. यापैकी पश्चिम पट्ट्यातील व पिंपळनेर परिसरातील व शिव खट्याळ गावामध्ये एकत्रितपणे १५ आदिवासी शेतकºयांच्या माळरानावरील पडीक जमिनीवर सपाटीकरण उपक्रम राबववण्यात आला. यामुळे जमीन वहीतीखाली आली पण पुढे जमीनीसाठी पाणी उपलब्धता कशी होणार याविषयी चर्चा झाली व लोकांनी त्यांच्या शेतीशेजारील गाळाने भरलेला माती नालाबांध खोलीकरण करण्याची मागणी संस्थेकडे केली. त्यानुसार १०० तास तलावातील गाळ काढणे व खोलीकरण करणे असे काम जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आले.
या उपक्रमामुळे परिसरातील ७० ते ८० शेतकºयांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य येथील सरपंच व गावकरी यांनी संस्थेचे कौतुक केले. 
या सर्व कार्यासाठी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश राऊत, निलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अभंग जाधव, प्रशांत देसले, रवींद्र वळवी यांनी काम पहिले.
 

Web Title: Start of opening the lake at Shiv Khatyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे