धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा वेतन, निवडश्रेणीचा प्रश्न मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:01 PM2018-02-25T12:01:06+5:302018-02-25T12:01:06+5:30

जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची बैठक : उपमुख्यकार्यकारी अधिकाºयांनी दिले आश्वासन

Primary teachers' salary in Dhule district, selection issue will be needed | धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा वेतन, निवडश्रेणीचा प्रश्न मार्गी लागणार

धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा वेतन, निवडश्रेणीचा प्रश्न मार्गी लागणार

googlenewsNext
ठळक मुद्देया सोबतच प्राथमिक शिक्षकांना कायम नियुक्ती आदेश देणे, शालेय पोषण आहार मानधन, इंधन बिले वेळेवर मिळावेत, शालार्थ वेतन प्रणालीतील त्रृटी दूर करून, पगार वेळेवर अदा करावेत, एलआयसीचे हप्ते पगारातून कपात करणे, मुख्याध्यापक, विषय शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांची रिक्त पदे त्वरीत भरणे, मोफत गणवेशाचे विद्यार्थ्यांचे संयुक्त खाते पालकांच्या नावे उघडण्यात यावे, जिल्हा शिक्षण विभागात लिपीकवर्गीय कर्मचाºयांची संख्याशिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबात तालुका व जिल्हास्तरावर टोकणपद्धत सुरू करावी यांसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला  वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचा प्रश्न लवकरात लवकर सोडण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिले. 
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यादृष्टीने  जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या मागणीनुसार नुकतीच  जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये  उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 
यावेळी व्यासपीठावर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, गटशिक्षणाधिकारी पी.टी. शिंदे, पी.बी. भिल (साक्री) होते.   
यावेळी १२ वर्षे सेवा पूर्ण करणाºया शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व २४ वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी तातडीने लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी  समन्वयक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे, राजेंद्र खैरनार, राजेंद्र नांद्रे, राजेंद्र जाधव, विजय पाटील, बापू पारधी, शरद पाटील, विश्वनाथ सोमवंशी, गणेश वाघ, भूपेश वाघ, चंद्रकांत सत्तेसा, ज्ञानेश्वर पवार, शांताराम देवरे व समन्वय समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Primary teachers' salary in Dhule district, selection issue will be needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.