चारा टंचाईबाबत उपाय योजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:39 AM2019-05-20T11:39:52+5:302019-05-20T11:40:26+5:30

पालक सचिवांना निवेदन : शिवसेनेसह शहर जिल्हा इंदिरा कॉग्रेस मागणी

Plan a solution for fodder scarcity | चारा टंचाईबाबत उपाय योजना करा

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करतांना मुकुंद कोळवले व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते.   

Next

धुळे : जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ जिल्हाप्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना चारासह पाण्यासाठी तत्काळ उपाय योजना कराव्यात अशी मागणी निवेदनाव्दारे शिवसेनेतर्फे पालक सचिवांकडे करण्यात आली 
धुळे तालुक्याला सध्या भिषण पाणी टंचाईवर मात करावी लागत आहे़ फागणे, मुकटी, बाळापूर अजंग, अंचाळे, चिंचखेडे, वणी, कुंडाणे आदी २१ गावे पाणीपुरवठा योजना तत्काळ  सुरू करावी़ जिल्हा परिषदस्तरावर पाठपुरावा, आंदोलन करून देखील प्रश्न सुटलेला नाही़ तसेच सडगांव अजनाळे, बल्हाणे येथील बंद पडलेली योजना युध्द पातळीवर सुरू कराव्यात. 
जलयुक्तचे कामे मार्गी घ्यावे
जलयुक्त शिवारासाठी वाढीव पॅकेज देवून  कामे लावावित़ त्यामुळे दुष्काळावर मात करता येवू शकतो़ सध्या काही गावांना पंधरा दिवस  ते महिन्याभरानंतर पाणी मिळत नाही़ त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागते़  निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला    आहे़ यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आ. शरद पाटील, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, उपतालूका प्रमुख देवराम माळी, विलास चौधरी, गजेंद्र पाटील,नितीन पाटील गितेश पाटील, भाऊसाहेब देसले, आनंदा पारखे, भुषण सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

चारा छावण्यांसह टॅकर सुरू करा : कोळवले
जिल्हात सर्वत्र पाणीटंचाई असुन नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ पश्चिम महाराष्ट्रात एका महिन्यापासुन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत़ त्याप्रमाणे धुळे शहर व जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, प्रत्येक पशुधनास १८ किलो ढेप देवुन पाण्याची व्यवस्था करावी़ अशी मागणीचे निवेदन पालक सचिवांना धुळे शहर कॉँग्रेस समितीचे उपाध्यक्ष मुकुंद कोळवले यांनी दिले़ 

 

Web Title: Plan a solution for fodder scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे