उशिरा येणाºया धुळे जिल्हा परिषदेतील ३५ कर्मचाºयांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:26 PM2018-11-21T12:26:41+5:302018-11-21T12:28:01+5:30

उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन.आभाळे यांनी दिल्या आठ विभागांना भेटी

Notification issued to 35 employees of Dhule District Council for coming late | उशिरा येणाºया धुळे जिल्हा परिषदेतील ३५ कर्मचाºयांना बजावली नोटीस

उशिरा येणाºया धुळे जिल्हा परिषदेतील ३५ कर्मचाºयांना बजावली नोटीस

Next
ठळक मुद्देउपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आठ विभागांना भेटकाही विभागात कर्मचारी वेळेत आलेच नव्हतेगैरहजर कर्मचाºयांकडून मागितला खुलासा

आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे यांनी आज सर्वच विभागांना अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान आठ विभागातील ३५ कर्मचारी वेळेत कार्यालयात आलेच नव्हते. या सर्व कर्मचाºयांना नोटीस बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. अधिकाºयांच्या या ‘सरप्राईज व्हीजीट’मुळे कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे. कार्यालयाची वेळ सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंतची असतांना अनेक विभागातील कर्मचारी वेळेवर येत नाही. काहीजण दौºयाच्या निमित्ताने परस्पर दांडी मारीत असातत. याचा परिणाम कामकाजावर होत असतो. 
त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे यांनी आज कार्यालयात आल्याबरोबरच प्रत्येक विभागाला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली. त्याची सुरूवात सामान्य प्रशासन विभागापासून केली.  त्यांच्या कार्यालयातच तब्बल ११ कर्मचारी जागेवर आढळून आले नाहीत. यानंतर त्यांनी ग्रामपंचायत, लघुसिंचन, बांधकाम यासह आठ विभागांना भेटी दिल्या. या सर्व विभागात कर्मचारी उशिरा येत असल्याचे निदर्शनास आले. यात सभापतींची पीएंचाही समावेश आहे. 
उशिरा आलेल्या तसेच गैरहजर आढळून आलेल्यांमध्ये  सामान्य प्रशासनमधील ११, ग्रामपंचायत विभाग-७, बांधकाम विभाग-५, समाज कल्याण -५, लघुसिंचन-३, अर्थ विभाग २, पशुसंवर्धन व आरोग्य विभागात प्रत्येकी एक-एक कर्मचाºयाचा समावेश आहे.  या सर्वांना नोटीस देवून त्यांच्याकडून सात दिवसाच्या आत खुलासा मागविला आहे.  यात कर्मचाºयांच्या त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.  त्या-त्या विभागाच्या प्रमुखांमार्फतच हा खुलाचा प्राप्त होणार आहे. ज्या कर्मचाºयांचा खुलासा समाधानकारक वाटला नाही, त्या कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल, असेही आभाळे यांनी सांगितले. 
दरम्यान  या अचानक भेटीमुळे लेटलतीफ कर्मचाºयांचे धाबे दणाणले असून, मंगळवारी या भेटीचीच जि.प. मध्ये चर्चा सुरू होती. मात्र  अशी ‘सरप्राईज व्हिजीट’ सातत्याने देण्यात यावी अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.


 

Web Title: Notification issued to 35 employees of Dhule District Council for coming late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे