प्रामाणिकपणे काम केल्यास पुढील टप्पा सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:09 PM2019-02-23T12:09:42+5:302019-02-23T12:10:53+5:30

सुभाष भामरे : भावी वाटचालीसाठी दिला कानमंत्र

The next step is simple when working honestly | प्रामाणिकपणे काम केल्यास पुढील टप्पा सोपा

dhule

Next

धुळे : ह ‘लोकमत सरपंच अ‍ॅवार्ड’ हा पुरस्कार म्हणजे तुमची शिदोरी आहे. जे गावासाठी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांना लोकांचा आशीर्वाद घेऊन वाटचालीत पुढील टप्पा गाठणे सोपे जाते, असा कानमंत्र केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित सरपंचांना दिला. 
स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व द्या 
मनुष्याला होणारे ८० टक्के आजार स्वच्छता न ठेवल्याने होतात, हे मी एक डॉक्टर म्हणून सांगतो. त्यामुळे स्वच्छता व पिण्याचे पाणी शुद्ध नसेल तर रोग बळावतात. ते ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान योजना आणली. त्या अंतर्गत गावात नियमित स्वच्छता राखण्याचे काम प्राधान्याने करा, असा आरोग्यमंत्रही मंत्री डॉ.भामरे यांनी उपस्थित सरपंच व पदाधिकाऱ्यांशी दिलखुलासपणे साधलेल्या संवादात दिला. 
स्वातंत्र मिळून ७० वर्षे होत असून आपला देश प्रगल्भ होत असून त्यात प्रसिद्धी माध्यमां (मीडिया)चा मोठा वाटा आहे. त्यामुळे ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाºया सरपंचांचा विशेष पुरस्कार प्रदान करून सत्काराचा हा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल मी मनापासून ‘लोकमत’ अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले. गावाच्या काही समस्या, प्रश्न असतील तर तेथील सरपंचांनी आपल्याशी संपर्क करावा. आपण आवश्यक ती मदत व पाठपुरावा , असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
पुरस्कारापूर्वी सरपंचांना बांधला मानाचा फेटा 
४पुरस्काराची घोषणा होत असताना त्या सरपंचांच्या कार्याचा अल्पपरिचय करून दिला होता. त्याचवेळी मंचाच्या समोर सरपंचास मानाचा फेटा बांधण्याचे काम  कुशलपणे केले जात होते. त्यामुळे पुरस्कार स्वीकारताना सरपंच कोण हे साºयांना कळत होते. तसेच या फेट्यामुळे सरपंचांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला. 

Web Title: The next step is simple when working honestly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे