पटेल अभियांत्रिकीचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:18 PM2019-04-02T12:18:45+5:302019-04-02T12:19:03+5:30

शिरपूर : रेसिंग कार स्पर्धेत रोख २५ हजारसह सन्मानचिन्ह पटकाविले

National Entrance Test at Patel Engineering | पटेल अभियांत्रिकीचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

dhule

Next

शिरपूर : शहरातील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकेल इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांनी भारत फॉर्म्युला कार्टिंग अंतर्गत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या कार्टिंग चॅम्पियनशिप-२०१९ नॅशनल रेसिंग कार स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला़
मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये कार निर्मितीचे कौशल्य विकसित होण्यासाठी सदर स्पर्धा ही सुवर्ण संधी असून महाविद्यालयाने या स्पर्धेत यश मिळविले. दोन टप्प्यात घेण्यात येणारी ही स्पर्धा कोइंबतूर व तामिळनाडू येथे झाली.
स्पर्धेचा पहिला टप्पा व्हर्चुअल राऊंड असून त्यात लेखी परीक्षा आणि कार डिझाइनचे सादरीकरण केले गेले. त्यात आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने इलेक्ट्रिकल बेस कार सादर केली. दुसऱ्या टप्प्यात कारचे मॉडेल बनविण्यात आले. कोइंबतूर व तामिळनाडू येथे झालेल्या रेसिंग स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेली कार यशस्वीरित्या धावली. विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या कारचे तांत्रिकदृष्ट्या विविधस्तरावर परीक्षण केले जाते.
कार निर्मिती क्षेत्रातील तज्ञ मंडळी परिक्षक म्हणून काम पाहतात. त्यात रेसिंग कारची डिझाईन, गतिशीलता, ब्रेक, स्टिअरिंग, ट्रान्समिशन, वाहन सुरक्षितता अशा बºयाच चाचण्या घेतल्या जातात़
राष्ट्रीयस्तरावरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत नेत्रदिपक व उल्लेखनिय यश संपादन करून महाविद्यालय व संस्थेस नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उमवि माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, विभागप्रमुख प्रा. सुहास शुक्ल, डॉ. नितीन पाटील, प्रा.प्रवीण सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डी. आर. पाटील, प्रा. विजय पाटील, प्रा.मिल्केश जैन, रजिस्ट्रार प्रशांत महाजन यांनी केले.

Web Title: National Entrance Test at Patel Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे