धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:08 PM2019-03-30T12:08:48+5:302019-03-30T12:10:42+5:30

१७ गावांना १४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा : उपाययोजनांची वाढती मागणी

Increase in water intensity intensity in Dhule district | धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ 

धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ 

Next
ठळक मुद्देपुरेशा पावसाअभावी यंदा टंचाईची झळ अधिकशिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक ११ टॅँकर धुळे तालुक्यात फागण्यासह तीन गावांना टॅँकरने पाणीपुरवठा 

लोकमत आॅनलाईन
धुळे : गेल्या आठवड्याभरात तापमानाचा पारा वाढू लागताच जिल्ह्यात टंचाईची तीव्रताही वाढली असून उपाययोजनांची मागणीही होऊ लागली आहे जिल्ह्यात सद्यस्थितीत धुळे व शिंदखेडा या दोन तालुक्यात मिळून एकूण १७ गावांना १४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच अधिग्रहित केलेल्या खाजगी विहिरींची संख्याही वाढत चालली आहे. 
गेल्यावर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धुळे, शिंदखेडा तालुक्यात गंभीर दुष्काळ तर शिरपूर तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झालेला आहे.  साक्री तालुक्यातही दोन महसुली मंडळे वगळता उर्वरीत सर्व मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत पाणीटंचाईच्या तीव्रतेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
शिंदखेडा तालुक्यात 
टंचाईची सर्वाधिक झळ
जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यास दुष्काळाचा मोठा फटका बसत असून टंचाईची सर्वाधिक झळ या तालुक्यातील गावांना बसत आहे. तेथे गेल्या पावसाळ्यापासून सात ते आठ गावांना पाणीपुरवठ्यासाठी टॅँकर सुरू आहे. त्यात पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात व आता उन्हाळ्यात भर पडत चालली आहे. सद्यस्थितीत या तालुक्यात तब्बल १४ गावांना ११ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यात वरूळ घुसरे, चुडाणे, विखरण, सोनशेलू, रहिमपुरे, कामपूर, झिरवे, विटाई, दत्ताणे, अजंदे, मेलाणे, डाबली, निशाणे व भडणे या गावांचा समावेश आहे. या शिवाय अन्य गावांसाठी खाजगी विहिरीही अधिग्रहित करण्यात येत आहेत. सध्या तापमानात वाढ झाल्याने अनेक गावांकडून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह जिल्हा प्रशासनाकडे तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 
धुळे तालुक्यात तीन टॅँकर सुरू 
जिल्ह्यात शिंदखेड्यानंतर धुळे तालुक्यातही मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. सध्या फागणे, वडजाई व कुंडाणे (वेल्हाणे) या तीन गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 
आवर्तनासाठी आंदोलने 
धुळे व साक्री तालुक्यातील धरणांमध्ये अद्याप बºयापैकी साठा आहे. मात्र तो जुलैअखेर पुरविण्याचे नियोजन आहे. मात्र टंचाईने त्रस्त ग्रामस्थांकडून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली जात असून त्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला जात आहे 

 

Web Title: Increase in water intensity intensity in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे