आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालास भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:42 PM2019-02-17T22:42:04+5:302019-02-17T22:42:22+5:30

आमदार बच्चू कडू  : विखरण येथे शेतकरी मेळावा, नाशिकच्या कांदा परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन 

Give a price to the farmer to stop the suicide | आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालास भाव द्या

आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालास भाव द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : शेतकºयांचा आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीमालाला हमी भाव देऊन शेतकºयांना संपूर्ण कर्ज माफी व स्वामीनाथन आयोग लागू केला तरच शेतकºयांचा आत्महत्या थांबविता शकतात असे मत आमदार बच्चू कडूू यांनी व्यक्त केले़ 
शिंदखेडा तालुक्यातील  विखरण येथे प्रहार जनशक्ति पक्षातर्फे  येथे  धर्मा पाटील यांचा पुण्यस्मरणार्थ शेतकरी मेळावा घेण्यात आला़ यावेळी माजी आमदार रामकृष्ण पाटील ,  सरपंच  दशरथ आहिरे , प़स़ सदस्य मनोहर देवरे, सतीश पाटील, नरेंद्र पाटील,  नितिन पाटील, वसंत बोरसे, तुषार बोरसे, विकास सूर्यवंशी, शशिकांत सूर्यवंशी, महेंद्र पाटील  आदी उपस्थित होते .
पुढे बोलतांना आमदार कडू म्हणाले की, शेतकºयांच्या आत्महत्याकडे जात, धर्म म्हणून पाहू नका, 
शेतकºयांला जात नसते. सर्व जातीपेक्षा शेतकरीची जात मोठी आहे़  धर्म, जात पेक्षा आम्हाला शेतकºयांचे, मजुराचे, विधवा महिलाचे , अपंगांचे प्रश्न महत्वाचे आहेत. 
शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नोकरदाराप्रमाणे  संघटीत व्हावे लागेल. प्रहार कोणत्याही जातीसोबत नाते जोडले नाही. नाते आम्ही अन्यायाशी जोडले आहे. हमी भाव नाही तर मत नाही अशी भूमिका शेतकºयांची पाहिजे. मताचा वार करा. शेतकरीची आयुष्याची लढाई आहे़ त्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन  ताकतीने  लढा दिला पाहिजे़ तरच शेतकºयांचे  चित्र बदलेल. २४ तारखेला नाशिक येथे  कांदा परिषद घेतली असून या परिषदेला  मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे  आवाहन आमदार कडू यांनी शेतकºयांना केले़
अन्यथा लढाई लढू
धर्मा पाटील यांना जमिनीच्या मोबदला बाबत अन्याय झाला. त्यांची आत्महत्या वाया जाणार नाही, प्रशासनाने योग्य न्याय दिला नाही तर  बचू कडू ही लढाई लढेल. नरेद्र पाटील आता एकटे नाहीत. प्रहार पक्ष त्याचा सोबत आहे़ असे आमदार कडू यांनी सांगितले़ 

Web Title: Give a price to the farmer to stop the suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे