जिल्ह्यात २० हजार शेतकºयांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 04:27 PM2017-12-12T16:27:14+5:302017-12-12T16:28:19+5:30

छत्रपती शेतकरी सन्मान योजना : जिल्हा उपनिबंधकांची माहिती; १०० कोटी ६७ लाख रुपये खात्यात वर्ग

Debt relief to 20 thousand farmers in the district | जिल्ह्यात २० हजार शेतकºयांना कर्जमाफी

जिल्ह्यात २० हजार शेतकºयांना कर्जमाफी

Next
ठळक मुद्देनाशिक विभागात धुळे जिल्हा बँक प्राप्त झालेल्या निधीचे १०० टक्के वाटप करणारी पहिली जिल्हा बॅँक ठरली आहे.  प्राप्त निधी धुळे जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांच्या कर्जखाती जमा करण्यात आलेली आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व दीड लाख रुपयांवरील लाभार्थी शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी एक वेळ समजोता योजनेंतर्गत दीड लाख रुपयांवरील रक्कम संबंधित जिल्हा बँकेच्या शाखेकडे ३० मार्च २०१८ च्या आत जमा करणे आवश्यक आहे. जिल्हा बँकेकडून व इतर बँकेकडून एकाच शेतकरी कुटुंबाने दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली असेल, अशा शेतकरी कुटुंबांनी राज्य शासनाने दिलेल्या वाढीव मुदतीत ३१ मार्च २०१८ पर्यंत संबंधित बॅँकेत रक्कमेचा भरणा करुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २० हजार ५५२ शेतकºयांना १०० कोटी ६७ लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली आहे. 
सन २०१२-२०१३ ते २०१५-२०१६ या सलग चार वर्षात राज्य व जिल्ह्यात अपुरा पाऊस झाला. परिणामी, खरिप व रब्बी हंगामात बहुसंख्य गावातील आणेवारी ५० पैश्यांपेक्षा कमी होती. जिल्ह्यातील काही भागात झालेली गारपीट, अवेळी पाऊस झाल्याने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले होते.  त्यामुळे बरेच शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकलेले नाहीत.
 परिणामी, हे शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे शेतकरी बॅँकेकडून नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र होऊ शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अशा थकीत शेतकºयांचे कर्जमाफ करण्याचे जाहीर केले होते. 
शेतकºयांना दिलासा 
संकटात सापडलेल्या शेतकºयांना राज्य शासनाने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. 
या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९  ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रुपयांवरील शेतकºयांना एकवेळ समझोता योजना लागू केली.
 तसेच २०१५- २०१६, २०१६- २०१७ वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषीत केले होते. 
त्यानुसार २००९-२०१० ते २०१५-२०१६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठणन केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील त्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचे घोषीत करण्यात आले होते. 
जिल्हा बॅँकेचे १३ हजार तर राष्टÑीयकृत बॅँकेच्या ७ हजार शेतकºयांना लाभ 
शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या धुळे जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांनी राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाइन माहिती भरुन दिली होती. त्यानुसार धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धुळे जिल्ह्यातील १३ हजार ३६१ शेतकºयांना ५० कोटी ४५ लाख ८४ हजार ९२३ रुपयांची कर्जमाफी आतापर्यंत मिळाली आहे. याबाबत आतापर्यंत कर्जमाफी दिलेल्या १५ हजार शेतकºयांना त्यांच्या  मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात आले आहे. 
तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या खातेदार ७ हजार १९१ शेतकºयांच्या खात्यात ५० कोटी २२ लाख रुपयांची कर्जमाफीची  रक्कम जमा करण्यात आली आहे. 
जिल्ह्यातील २० हजार शेतकºयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार संबंधित शेतकºयांच्या बॅँक खात्यावर १०० कोटी ६७ लाख रुपये वर्ग करण्याचे कामही झाले असून कर्जमाफीची पुढील कार्यवाही सुरू आहे. 
    - जे. के. ठाकूर, जिल्हा उपनिबंधक
जे शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत ते पुढील वर्षी कर्ज घेण्यासाठी पात्र होणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव, बँकेचे तपासणीस, विशेष वसुली अधिकारी, विभागीय अधिकारी, बँकांचा माहिती व तंत्रज्ञान विभाग, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १, राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक, आदींचे सहकार्य लाभल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक ठाकूर यांनी दिली आहे. 
राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. तेव्हा धुळे जिल्ह्यात ९१ हजार ८६८ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज सादर केले होते. परंतु, आतापर्यंत केवळ २० हजार ५५२ शेतकºयांनाच कर्जमाफीचा लाभ होऊ शकला असून उर्वरीत ७१ हजार ८६८ शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा असल्याचे दिसत आहे. प्रशासकीय पातळीवरून कर्जमाफीची पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले जात असून ही कार्यवाही कधीपर्यंत पूर्ण होणार? याकडे शेतकरी लक्ष लावून बसले आहे. 

Web Title: Debt relief to 20 thousand farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.