धुळे बाजार समितीत ‘सीसीटीव्ही’ची नजर!

By Admin | Published: July 4, 2017 03:28 PM2017-07-04T15:28:45+5:302017-07-04T15:28:45+5:30

45 एकर क्षेत्रात 26 कॅमे:यांद्वारे लक्ष. शेतकरी, व्यापा:यांची सुविधा; वार्षिक साडेचारशे कोटींची उलाढाल

CCTV eye in Dhule market committee! | धुळे बाजार समितीत ‘सीसीटीव्ही’ची नजर!

धुळे बाजार समितीत ‘सीसीटीव्ही’ची नजर!

googlenewsNext
>सुरेश विसपुते /ऑनलाईन लोकमत 
धुळे,दि.4 - बाजार समितीत होणा:या चोरीच्या घटना टाळण्यासाठी संपूर्ण आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे:यांमुळे परिणामकारक यश मिळाले आहे. 45 एकर क्षेत्रात असलेल्या बाजार समितीतील घटना घडामोडींवर 26 कॅमे:यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. अशी व्यवस्था करणारी जिल्ह्यातील ही पहिलीच बाजार समिती ठरली आहे. 
धुळे बाजार समितीने वर्षभरापूर्वी चोरीच्या छोटय़ा-मोठय़ा घटनांना प्रतिबंध बसावा तसेच बाजार समितीच्या भव्य आवारातील संपूर्ण घटना, घडामोडींवर नियंत्रण व लक्ष ठेवता यावे यासाठी स्वनिधीतून मोक्याच्या जागांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण आवार सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आणण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला. एकूण 26 कॅमेरे लावण्यात आले आहेत. 
विद्यमान सभापती सुभाष देवरे व संचालक मंडळाने हा निर्णय घेत पूर्ण केला. या कामाकरीता बाजार समितीला सुमारे 3 लाख रुपये खर्च आला. मात्र यामुळे आता बाजार समितीच्या 45 एकर क्षेत्रावर एकाचवेळी लक्ष ठेवून नियंत्रण राखण्याचे काम सोपे झाले आहे. मंगळवारी बाजाराच्या दिवशी होणा:या भुरटय़ा चो:यांना यामुळे पूर्णपणे आळा बसला आहे. या शिवाय शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला माल अनवधानाने कोणी घेऊन गेला, इकडे-तिकडे ठेवला गेला तर त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत होते. बाजार समितीत व्यापा:यांचा त्यांनी खरेदी केलेला माल मोठय़ा प्रमाणात असतो. चुकून त्यातील काही कट्टे दुस:या गाडीत भरले गेले असतील, तर तेही लक्षात येण्यास यामुळे मदत होते. त्यामुळे नुकसान व  परिणामी होणारा मनस्ताप टाळण्यास मोठीच मदत झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 
राज्यात स्थापन झालेली दुसरीच बाजार समिती! 
ब्रिटीश राजवटीत 1 सप्टेंबर 1930  रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. ब्रिटीश सरकारने नेमलेल्या रॉयल कमिशनने शेतमाल खरेदी-विक्रीसाठी एक स्वतंत्र संस्था असावी, अशी शिफारस अहवालाद्वारे सरकारला केली होती. त्यानंतर राज्यात वाशिम जिल्ह्यात लाडकारंजा येथे 1885 साली पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्यानंतर धुळे येथे दुस:या बाजार समितीची स्थापना करण्यात आली होती. 
फळ-भाजीपाला खरेदी-विक्री नियमनाचा पहिला मान!
1974 साली फळ व भाजीपाला खरेदी-विक्रीचे नियमन करणारी राज्यातील पहिली बाजार समिती ठरण्याचा मान या बाजार समितीला मिळाला. तत्पूर्वी बाजार समितीत केवळ धान्याचीच खरेदी-विक्री होत असे. आता या बाजार समितीत गुरांच्या बाजारासह 62 कम्युनिटी निर्माण झाल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: CCTV eye in Dhule market committee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.