बालाजी मंदीर संस्थानच्या दिंडीचे स्वागत, बियांचे वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:26 AM2019-06-20T11:26:01+5:302019-06-20T11:26:28+5:30

बालाजी मंदीर संस्थानच्या दिंडीचे धुळे शहरातील मोठ्या पुलावरून आगमन झाले. 

Balaji Mandir Institute's reception, distribution of shares | बालाजी मंदीर संस्थानच्या दिंडीचे स्वागत, बियांचे वाटप 

dhule

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा येथील बालाजी मंदीर संस्थानचे  मठाधिपती ह.भ.प.मेघश्याम महाराज यांच्या पंढरपूर दिंडीतील वारकरी यांना विविध प्रजातीच्या वृक्षांच्या बियांचे  वाटप करण्यात आले.
कापडणे येथून पुढच्या प्रवासाला निघालेल्या या दिंडीचे धुळे येथे विद्यानगरी परिसरातील नरेंद्र भटू पाटील यांच्या निवासस्थानी दिंडीचे स्वागत करण्यात आले. शेकडो वारकरी दिंडीत सहभागी आहेत त्यांना अल्पोपाहार देण्यात आला. याप्रसंगी तालुका पर्यावरण मित्र संघटनेचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष गोकुळ देवरे, महिला अध्यक्षा दीपा वानखेडे. बालसंस्कार केंद्राच्या निता खत्री यांनी वारकºयांना झाडांच्या बियांची पाकीटे वाटप केली. या वेळी प्राचार्य प्रमोद कचवे, रजिस्ट्रार  जे.एस.पाटील, आनंद कुलकर्णी.    निसर्ग मित्र समितीचे संतोष आबा पाटील, संजय पाटील, भटू पाटील, जे.टी पवार सर, विनोद देवरे, सूर्यवंशी, एन.आर. पाटील, राजू पाटील उपस्थित होते.

 

Web Title: Balaji Mandir Institute's reception, distribution of shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे