धुळयात ढोलताशांच्या निनादात ‘श्रीं’चे जल्लोषात आगमन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 02:36 PM2018-09-13T14:36:40+5:302018-09-13T14:38:35+5:30

बाजारपेठेत गर्दी उसळली, शहरात उत्साहाचे वातावरण

Arrives in Dhanata's Dhanashtas Nankayat's Shankaracharya | धुळयात ढोलताशांच्या निनादात ‘श्रीं’चे जल्लोषात आगमन 

धुळयात ढोलताशांच्या निनादात ‘श्रीं’चे जल्लोषात आगमन 

googlenewsNext
ठळक मुद्देसकाळपासूनच मूर्ती खरेदणाºयांची झाली गर्दीढोलताशांच्या आवाजाने शहर निनादलेबाजारपेठेत लाखोंची उलाढाल

आॅनलाईन लोकमत
धुळे - ढोलताशांचा निनाद... गुलालाची उधळण.... व गणपती बाप्पा मोरया.... अशा गगनभेदी घोषणा देत गुरूवारी शहरासह जिल्ह्यात  अपूर्व उत्साहात विघ्नहर्ता गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. ‘श्री’च्या स्वागतासाठी बाजारपेठही सजली होती. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करण्यात येत होती. गणरायाच्या आगमनानिमित्त सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते. 
  शहरातील विविध भागात मूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. त्यामुळे गणेशोत्सवाची वातावरण निर्मिती दोन दिवसांपूर्वीच झालेली होती. गुरूवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील बाजारपेठा गजबजून गेलेल्या होत्या.धुळे शहरात संतोषी माता चौक ते कमलाबाई कन्या हायस्कुलपर्यंतच्या रस्त्यावर आणि आग्रारोडवर महात्मा गांधी चौक ते पारोळा रोडवर सिग्नल चौकापर्यत जुन्याआग्रारोडवर दुतर्फा मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली होती. त्याचबरोबर पुजेचे साहित्याचीही लहान-लहान दुकाने लावण्यात आलेली होती. घरोघरी ‘श्रीं’ची स्थापना होत असल्याने, नागरिक कुटुंबातील सदस्य, चिमुकल्यांसह बाजारपेठेत दाखल झाले होते. स्वत:सोबतच लहानग्यांना पसंत पडणारी मूर्ती खरेदीला प्राधान्य देण्यात येत होते. 
 आग्रारोड, साक्रीरोडवर ढोल व ताशांची पथके सज्ज होती. संध्याकाळपर्यत गणेशमूर्तीची खरेदी होताच ती स्थापनेच्या ठिकाणी नेण्यासाठी ढोलताशांच्या निनादात लगबग सुरू व्हायची. तरूण कार्यकर्ते नृत्य करीत, तसेच गुलालाची उधळण करीत श्रींच्या मूर्तीसह मार्गस्थ होत होते.
बाजारपेठेत प्रचंड गर्दी- मूर्ती व पूजेचे साहित्य खरीदण्यासाठी अनेकजण बाजारपेठेत दाखल झाल्याने, फुलवाला चौक, संतोषी माता परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले होते.या परिसरात चालायलाही जागा नव्हती. भाद्रपदाचे कडक उन्ह असतांनाही गणेशभक्तांचा उत्साह तुसभरही कमी झालेला नव्हता. काहींनी पारंपारिक वाद्य वाजवित तर काहींनी मोठे वाद्य लावून गणरायाला वाजतगाजत मंडपात नेले.


 

Web Title: Arrives in Dhanata's Dhanashtas Nankayat's Shankaracharya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे