धुळे शहरात २७८ रुग्णांवर क्षयरोगाचे उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 09:35 PM2017-12-03T21:35:51+5:302017-12-03T21:36:37+5:30

मनपा : सोमवारपासून क्षयरुग्ण शोध मोहिम; संशयित रुग्णांना मोफत औषधोपचार

278 patients in Dhule city have started treatment for tuberculosis | धुळे शहरात २७८ रुग्णांवर क्षयरोगाचे उपचार सुरू

धुळे शहरात २७८ रुग्णांवर क्षयरोगाचे उपचार सुरू

Next
ठळक मुद्देघरांना भेटी देताना कोणाला क्षयरोग रुग्ण आढळून आल्यास मनपा कर्मचारी संशयित क्षयरोग रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेतील. तसेच संबंधित रुग्णांची क्ष-किरण तपासणीही करण्यात येईल. ही तपासणी मनपातर्फे मोफत करण्यात येईल. क्ष-किरण तपासणीमध्ये क्षयरोगाचे निदान झाले तर संबंधित ४रुग्णांची सीबीनॅट मशीनद्वारे मोफत तपासणी केली जाईल.ही तपासणी व औषधोपचार मोफत केले जातील.

यांना मिळणार प्रोत्साहनपर भत्ता
या कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचा रुग्ण सापडून देणाºया मनपा कर्मचाºयाला ५०० रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. नागरिकांनी या मोहीमेंतर्गत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.  फुफुसांचा क्षयरोग असणारे बरचसे क्षयरुग्ण त्यांना होणाºया त्रासाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 


क्षयरोग शोध मोहीमेस सोमवारपासून सुरुवात होत आहे. शहरातील झोपडपट्टी व दाटवस्तीच्या भागात विशेषत: ही मोहीम राबविली जाईल.या मोहीमेंतर्गत क्षयरोग निदान चाचण्या या मोफत केल्या जाणार असून या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
    - डॉ. बी. बी. माळी, शहर क्षयरोग अधिकारी, मनपा 

Web Title: 278 patients in Dhule city have started treatment for tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.