‘गुगल डॉक्टर्स’मुळे नात्यात अविश्वास : दिग्गज दापके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 05:44 PM2019-03-30T17:44:09+5:302019-03-30T18:49:31+5:30

डॉक्टर डे दिवशी उलगडली डॉक्टरांपुढील आव्हाने

Unbelief in relationship with Google doctors: Giants Dapke | ‘गुगल डॉक्टर्स’मुळे नात्यात अविश्वास : दिग्गज दापके

‘गुगल डॉक्टर्स’मुळे नात्यात अविश्वास : दिग्गज दापके

googlenewsNext

उस्मानाबाद : इंटरनेटची गतिमानता ही वैद्यकीय व्यवसायातही पोहोचली आहे़ त्यामुळे उपचारात चांगली मदत होत असली तरी, दुष्परिणामही जाणवत आहेत़ काही नातेवाईक पेशंटच्या आजाराची अर्धवट माहिती गुगलवरुन मिळवतात व त्याआधारे डॉक्टरांशी हुज्जत घालण्याचे प्रकार वाढीस लागल्याचे मत उस्मानाबाद येथील डॉ़. दिग्गज दापके-देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़

डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून डॉ़ दापके-देशमुख यांनी ‘डॉक्टरांपुढील नवी आव्हाने’ या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या़ 

कायद्यामुळे रिस्क नको, ही भावना
वैद्यकीय व्यवसायाला सध्या ग्राहक संरक्षण कायद्याच्या चौकटीत आणले गेले आहे़ तेव्हापासून डॉक्टर व पेशंटचे नाते हे ग्राहक व सेवापुरवठादार यांच्याप्रमाणे बनले आहे़ कायद्याच्या दंडुक्यामुळे वैद्यकीय व्यवसायिकही जास्त रिस्क घ्यायला तयार नाहीत़ त्यामुळे सातत्याने पेशंटचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये खटके उडू लागले आहेत़

वैद्यकीय सेवेचे कॉर्पोरेटायझेशऩ़़
वैद्यकीय सेवेचे कॉर्पोरेटायझेशन झपाट्याने होत असल्याने उपचार महागडे होत चालले आहेत़ अत्याधुनिक उपचार सेवा देण्यासाठी अगदी विदेशातूनही हजारो, लाखो डॉलर खर्चून यंत्रसामग्री आणली जाते़ त्यातील गुंतवणूक व देखभाल खर्च याचा ताळमेळ बसविताना उपचाराचा खर्च वाढत चालला आहे़ यामुळेही रोष वाढत चालला आहे़ मात्र, हा रोष कॉर्पोरेट लॉबीवर न जाता सामान्य डॉक्टरांवर जास्त येतो़

बाऊन्सर्स ठेवण्याची वेळ
मागे म्हटल्याप्रमाणे अर्धवट ज्ञानाद्वारे डॉक्टरांशी हुज्जत घालणे, उपचाराची पद्धती व त्यावर होणारा खर्च जाणून न घेताच वादविवाद करणे, प्रसंगी एखादी दुर्घटना झालीच तर डॉक्टर, रुग्णालयावर हल्ला करणे, असेही प्रकार होत आहेत़ त्यामुळे रुग्णालय प्रशासनास बाऊन्सर्स ठेवण्याची वेळ येत आहे़ अनेक ठिकाणी असे प्रयोग केले गेले आहेत़

अपडेट राहण्याचेही आव्हाऩ
जगात नियमितपणे नवनवे आजार, त्यावरील उपचार, संशोधने झपाट्याने येत आहेत़ याकडे डॉक्टर्सना लक्ष ठेवून रहावे लागते़ वैयक्तिक आयुष्य जवळपास नसलेल्या डॉक्टरांना याही पातळीवर सजग राहण्यासाठी वेळ काढावाच लागतो आहे़

Web Title: Unbelief in relationship with Google doctors: Giants Dapke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.