ओम राजेंविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

By Admin | Published: September 16, 2014 12:41 AM2014-09-16T00:41:15+5:302014-09-16T01:31:40+5:30

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीतील आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह चौघाविरूध्द सोमवारी

Code of Conduct against Om King Breach of Crime | ओम राजेंविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

ओम राजेंविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

googlenewsNext


उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीतील आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह चौघाविरूध्द सोमवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीच्या प्रारंभीच हा अपशकुन झाल्याची सोमवारी शहरात चर्चा होती.
पोलिसांनी सांगितले की, आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सोमवारी सकाळी रामनगर येथील ग्रीनलँड शाळेतील विद्यार्थ्यांसमोर पुरस्कार विजेता या पॉम्पलेटचे वाचन केले़ तर हे पॉम्पलेट सतीश सोमानी यांनी कोणतीही परवानगी घेता छापले व शाळेच्या मुख्याध्यापकाने कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची फिर्याद नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली़ यावरून आ. ओमराजे निंबाळकर यांच्यासह सतीश सोमानी तसेच ग्रीनलँड शाळेच्या मुख्याध्यापकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि राजेंद्र बनसोडे हे करीत आहेत़
आदर्श आचारसंहितेबाबत मुंबई येथील मे़पृथ्वी असोसिएशनच्या व्यवस्थापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत़ मात्र, तरीही त्यांनी उस्मानाबाद आगारात आलेल्या हैद्राबाद, भूम, नेवासा, अक्कलकोट, रावेर, तुळजापूर आदी बसेसवर विविध जाहिरात करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला़ या प्रकरणी आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पृथ्वी असोसिएशनच्या व्यवस्थापकांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि मानभाव हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Code of Conduct against Om King Breach of Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.