Yoga teacher arrested in connection with the molestation of the woman | महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी योगा शिक्षकाला अटक
महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी योगा शिक्षकाला अटक

ठळक मुद्देपीडित महिला ही राजूच्या योगा क्लासमध्ये शिकायला जात होती. काही दिवसांनंतर या महिलेने या योगा क्लासला जाणं बंद केलं आणि दुसऱ्या क्लासमध्ये प्रवेश घेतलाराजू या महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता.

मुंबई - महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका योगाशिक्षकाला अटक केली आहे. राजू घोष (22) असं या आरोपी योगाशिक्षकाचं नाव आहे. हा प्रकार मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू परिसरात घडली आहे.

पीडित महिला ही राजूच्या योगा क्लासमध्ये शिकायला जात होती. काही दिवसांनंतर या महिलेने या योगा क्लासला जाणं बंद केलं आणि दुसऱ्या क्लासमध्ये प्रवेश घेतला. हे कळाल्यानंतर राजू संतापला होता. त्याने पीडित महिलेचा पाठलाग करायला सुरूवात केली. राजू या महिलेसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. तू तुझ्या नवऱ्याला सोड आणि माझ्यासोबत रहा असं म्हणत राजू या महिलेला सातत्याने त्रास देत होता. तुझ्या शारीरिक व्याधी मी योगाने बऱ्या करतो अशी आश्वासनं देखील राजू या महिलेला देत होता. त्याच्याकडून होणारा नाहक त्रास सहन कारण असाह्य झाल्याने या महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि राजूविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी राजूला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने राजूला जामीन मंजूर केला आहे.

 

 


Web Title: Yoga teacher arrested in connection with the molestation of the woman
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.