मोबाईलचा लॉक पॅटर्न न दिल्याने तरुणीला पट्टयाने मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 05:36 PM2018-11-26T17:36:37+5:302018-11-26T17:38:22+5:30

मोबाईल लॉक पॅटर्न न दिल्याच्या कारणावरुन तरुणीला कमरेच्या पट्याने बेदम मारहाण करण्यात आली.

The women was beaten due to not giving lock pattern mobile | मोबाईलचा लॉक पॅटर्न न दिल्याने तरुणीला पट्टयाने मारहाण 

मोबाईलचा लॉक पॅटर्न न दिल्याने तरुणीला पट्टयाने मारहाण 

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

पिंपरी : मोबाईल लॉक पॅटर्न न दिल्याच्या कारणावरुन तरुणीला कमरेच्या पट्याने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास चिंचवडमधील काळभोरनगर येथे घडली. संभाजी गुलाब शेलार (वय ३०, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १९ वर्षीय तरुणी आणि संभाजी शेलार हे काळभोर येथे जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर एका मोटारीत बसले होते. दरम्यान, शेलार याने तरुणीकडे मोबाईल लॉक पॅटर्न मागितला. मात्र,तरुणीने मोबाईल लॉक पॅटर्न न दिल्याने शेलार याने तरुणीला कमरेच्या पट्याने मारहाण केली. यामध्ये तरुणीच्या तोंडाला, हाताला, डोळयाला इजा झाली. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: The women was beaten due to not giving lock pattern mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.