दुर्दैव... वडिलांच्याच पोलीस ठाण्यात लाडक्या लेकीच्या आत्महत्येची केस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 06:57 PM2018-07-14T18:57:26+5:302018-07-14T19:02:10+5:30

पोलीस हवालदाराच्या मुलीने केली आत्महत्या

Unfortunately ... the case of the suicide of a girl in police station where girl's father is working | दुर्दैव... वडिलांच्याच पोलीस ठाण्यात लाडक्या लेकीच्या आत्महत्येची केस

दुर्दैव... वडिलांच्याच पोलीस ठाण्यात लाडक्या लेकीच्या आत्महत्येची केस

Next

मुंबई - कुर्ला परिसरात नेहरू नगरातील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पूजा सुभाष सांगळे (वय - २१) या तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. त्यामुळे पोलीस वसाहतीत दुःखाच्या डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली. 

दोन दिवसांपूर्वी पूजा हिला रस्त्यावर चालत असताना चक्कर आल्याने लोकांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. नंतर उपचारासाठी तिला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर प्राप्त झालेल्या अहवालातून तिने विषजन्य द्राव्य प्राशन केल्याचं उघड झालं आहे. पूजा हि आर्किटेक्टच्या दुसऱ्या वर्षात नापास झाल्यानंतर पुन्हा तिने ऍडमिशन घेतले होते, कोणत्याही तणावाखाली ती नव्हती अशी माहिती शिंदे यांनी दिली. मुलीचे वडील सुभाष सांगळे हे पोलीस हवालदार म्हणून नेहरू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत आणि त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलीच्या आत्महत्येची नोंद झाली आहे. त्यामुळे संबंध पोलीस ठाणे देखील दुःखाच्या सावटाखाली आहे. 

Web Title: Unfortunately ... the case of the suicide of a girl in police station where girl's father is working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.