उल्हासनगर भाजप पदाधिकाऱ्यांच्या मुलासह चौघावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 06:06 PM2022-05-30T18:06:36+5:302022-05-30T18:10:43+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरातील मुख्य मार्केटमध्ये श्रावण पळसपगार यांनी दुकान भाड्याने घेऊन कार ऍक्सेसरीस नावाचे दुकान सुरू केले. दुकाना समोर ट्रक उभे का करता, यावरून यापूर्वी पळसपगार व विकास तोमर यांच्यात भांडण झाले.

Ulhasnagar Four persons, including the son of a BJP office bearer, have been charged with atrocity | उल्हासनगर भाजप पदाधिकाऱ्यांच्या मुलासह चौघावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

उल्हासनगर भाजप पदाधिकाऱ्यांच्या मुलासह चौघावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

googlenewsNext

सदानंद नाईक -

उल्हासनगर - जुन्या भांडणाच्या रागातून भाजपा मंडळ अध्यक्षाच्या मुलासह चौघांनी रविवारी रात्री पळसपगार यांच्या दुकानात घुसून जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी रोड व लाकडी दंडक्यांनी नितीन पळसपगार व राहुल याना मारहाण केली. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लाकडी फ्रेमचा फोटो खाली आपटल्याचा प्रकार घडला असून रात्री उशिरा चौघावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरातील मुख्य मार्केटमध्ये श्रावण पळसपगार यांनी दुकान भाड्याने घेऊन कार ऍक्सेसरीस नावाचे दुकान सुरू केले. दुकाना समोर ट्रक उभे का करता, यावरून यापूर्वी पळसपगार व विकास तोमर यांच्यात भांडण झाले. रविवारी रात्री विकास बच्चन तोमर, भगवान पांचाळ आणी दोन अनोळखी इसम दुकानात शिरून जुन्या भांडणाच्या रागातून जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. तसेच लोखंडी रोड व लाकडी दांड्याने नितीन पळसपगार व राहुल याला मारहाण केली. मारहाणीत दोघेही जबर जखमी झाले. तसेच दुकानात लावलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जमिनीवर आपटून दिला. दुकानात सुरू झालेली मारहाण बघून इतर दुकानदार यावेळी मदतीला धावल्याने मोठा अनर्थ टळला.

 भाजप मंडळ क्रं-३ चा अध्यक्षाच्या मुलाने मित्रांसह दुकानात शिरून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. याची माहिती रात्री सोशल मीडियावर व्हायरल होताच, मोठा जनसमुदाय मध्यवर्ती पोलीस ठाण्या समोर एकत्र आला. पोलीस ठाण्यात असलेला विकास ओमर बच्चन याला ताब्यात देण्याची मागणी समुदाय कडून करण्यात आली. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यानी एकत्र जमलेल्या समुदायाला शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा विकास बच्चन तोमर, भगवान पांचाळ यांच्यासह चौघावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. तर जखमींवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात उपचार सुरू आहे.

याप्रकरणी पोलिसांनी विकास बच्चन तोमर याला अटक केली असून न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत पोलीस कस्टडी दिल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली. तर इतर तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Ulhasnagar Four persons, including the son of a BJP office bearer, have been charged with atrocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.