विश्रांतवाडीतील रिक्षा चालकाच्या निर्घृण खूनप्रकरणी दोन जणांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 03:50 PM2018-10-09T15:50:10+5:302018-10-09T15:53:26+5:30

अनिल धोत्रे या रिक्षाचालकाचा अज्ञात इसमाने रविवारी पहाटे तीक्ष्ण हत्याराने तोंडावर वार करून निर्घृण खून केला होता .

Two people arrested in rickshaw driver murder case at Vishrantwadi | विश्रांतवाडीतील रिक्षा चालकाच्या निर्घृण खूनप्रकरणी दोन जणांना अटक 

विश्रांतवाडीतील रिक्षा चालकाच्या निर्घृण खूनप्रकरणी दोन जणांना अटक 

Next
ठळक मुद्देदोन्ही आरोपींना १२ आॅक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडीगुन्ह्यात आरोपींनी वापरलेली होंडा कार जप्त

पुणे  : विश्रांतवाडी येथील शेलार घाटावर रिक्षा चालकाचा निर्घृण खून करून फरार झालेल्या दोन सराईत आरोपींना विश्रांतवाडीपोलिसांनी अटक केली. ह्या घटनेत अनिल दत्तात्रय धोत्रे या रिक्षाचालकाचा तोंडावर तीक्ष्ण हत्याराने वार करून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी खून केला होता. या खूनप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी शफिक जयप्रकाश पांडे व रहमान उर्फ जाफर शेख (दोघे रा. रमाबाईनगर विश्रांतवाडी) या दोन आरोपींना अटक केली आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १२ आॅक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .या गंभीर गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली होंडा कार जप्त करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ,अनिल धोत्रे या रिक्षाचालकाचा अज्ञात इसमाने रविवारी पहाटे तीक्ष्ण हत्याराने  तोंडावर वार करून निर्घृण खून केला होता .खून करून आरोपी पसार झाले होते .या गंभीर खूनप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तपासासाठी पथके तैनात केली होती . मात्र हा गंभीर खून नेमका कोणता करण्यासाठी करण्यात आला ही बाब स्पष्ट नव्हती .त्यामुळे तपासात अनेक अडचणी येत होत्या .खुनाच्या घटनास्थळी शेलार घाट परिसरात उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व इतर गोपनीय माहितीवरून विश्रांतवाडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती .दरम्यान शेलार घाट परिसरातून दोन संशयित इसम होंडा अमेज गाडीतून गेल्याची खात्रीशीर माहिती विश्रांतवाडी तपास पथकातील कर्मचा्यांना मिळाली होती. शफिक पांडे हा शेलारघाट नजीक कैलास स्मशानभूमीत लपून बसल्याची गोपनीय माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली होती .त्यानुसार तात्काळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.  ही कारवाई परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील,गुन्हे निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक अभिजीत चौगुले,पोलीस उपनिरीक्षक जीवन बोरसे, पोलीस कर्मचारी प्रवीण राजपूत, विनायक रामाणे आदींच्या पथकाने केली.
 

Web Title: Two people arrested in rickshaw driver murder case at Vishrantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.