विमानतळावरून तीन कोटींचं सोनं जप्त; ३ श्रीलंकन नागरिक ताब्यात  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 06:08 PM2019-02-18T18:08:06+5:302019-02-18T18:09:08+5:30

एआययूने केलेल्या कारवाईत तीन श्रीलंकन नागरिकांमध्ये २ महिला आणि १ अल्पवयीन मुल आहे. 

Three crores of gold seized from the airport; 3 Citizens of Sri Lankan custody | विमानतळावरून तीन कोटींचं सोनं जप्त; ३ श्रीलंकन नागरिक ताब्यात  

विमानतळावरून तीन कोटींचं सोनं जप्त; ३ श्रीलंकन नागरिक ताब्यात  

Next
ठळक मुद्दे३ कोटी ३१ लाख ६० हजार किंमत असलेली सोन्याची बिस्किटं घेऊन येणाऱ्या तीन श्रीलंकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपीने सोन्याची तस्करी कोणासाठी केली होती याचा तपास एआययू करणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. रमा मॅथ्यू यांच्या दिली.  

मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एअर इंटेलिजन्स युनिट -एआययू) आज मोठी कारवाई करत १०,८१६ ग्रॅम सोन्याची बिस्किटं जप्त केली आहेत. तसेच ३ कोटी ३१ लाख ६० हजार किंमत असलेली सोन्याची बिस्किटं घेऊन येणाऱ्या तीन श्रीलंकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

एआययूने केलेल्या कारवाईत तीन श्रीलंकन नागरिकांमध्ये २ महिला आणि १ अल्पवयीन मुल आहे. आरोपीने सोन्याची तस्करी कोणासाठी केली होती याचा तपास एआययू करणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. रमा मॅथ्यू यांच्या दिली.  

Web Title: Three crores of gold seized from the airport; 3 Citizens of Sri Lankan custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.