पुणे येथे टेकडीवर फिरायला गेलेल्या युवक,युवतीला चाकूचा धाक दाखवून लुबाडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 02:51 PM2018-11-26T14:51:02+5:302018-11-26T14:52:17+5:30

हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन युवक आणि युवतीला धमकावून त्यांच्याकडील २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला आहे.

theft with of both student who had gone to the enjoying on tekdi at Pune | पुणे येथे टेकडीवर फिरायला गेलेल्या युवक,युवतीला चाकूचा धाक दाखवून लुबाडले 

पुणे येथे टेकडीवर फिरायला गेलेल्या युवक,युवतीला चाकूचा धाक दाखवून लुबाडले 

googlenewsNext
ठळक मुद्देयाबाबत १८ वर्षाच्या महाविद्यालयीन युवतीने डेक्कन पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

पुणे : हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन युवक आणि युवतीला धमकावून त्यांच्याकडील दागिने आणि २ मोबाईल असा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची शनिवारी दुपारी घडली. चोरट्यांनी महाविद्याालयीन युवतीला लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर डेक्कन तसेच चतु:शृंगी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. 
याबाबत  १८ वर्षाच्या महाविद्याालयीन युवतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन युवती आणि तिचा मित्र शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हनुमान टेकडी भागात फिरायला गेले होते. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि धमकावण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. युवतीकडील सोन्याच्या रिंगा आणि मोबाईल तसेच तिच्या मित्राकडील मोबाईल असा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला़  त्यानंतर चोरटे टेकडीवरून पसार झाले. घाबरलेल्या युवक आणि युवतीने थेट घरी गेले़ डेक्कन पोलिसांकडे रविवारी दुपारी त्यांनी येऊन आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती पोलिसांना दिली.
यापूर्वी हनुमान टेकडीवर फिरायला येणाऱ्या युगलांना धाक दाखवून लुबाडण्याच्या घटना जानेवारी तसेच फेब्रुवारी २०१६ मध्ये घडल्या होत्या़. त्यातील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली होती़ त्यानंतर आता पुन्हा हनुमान टेकडीवर दुपारी फिरायला गेलेल्या युवक-युवतींना लुबाडण्याची घटना घडली आहे़. डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: theft with of both student who had gone to the enjoying on tekdi at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.