गॅंगस्टर बिश्नोईच्या संपर्कात युवक, जीवंत काडतुसांसह दोन पिस्तूल हस्तगत

By नितिन गव्हाळे | Published: February 4, 2024 03:37 PM2024-02-04T15:37:04+5:302024-02-04T15:37:19+5:30

अकोट शहर पोलिसांची कारवाई, तिघांना अटक

The youth, in contact with gangster Bishnoi, seized two pistols with live cartridges | गॅंगस्टर बिश्नोईच्या संपर्कात युवक, जीवंत काडतुसांसह दोन पिस्तूल हस्तगत

गॅंगस्टर बिश्नोईच्या संपर्कात युवक, जीवंत काडतुसांसह दोन पिस्तूल हस्तगत

अकोट: गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणा-या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल, त्याचा भाउ अनमोल बिश्नोई याचे सोबत ऑडीओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल करून संपर्कात असलेल्या एका युवकासोबत आणखी दोघांना अकोट शहर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून ९ जीवंत काडतुसांसह दोन पिस्तूल हस्तगत केले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे हे १६ जानेवारी २०२४ रोजी गुन्हे शोध पथकासह पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन युवक हे अकोट-अकोला रोडवर अकोला नाक्याचे पुलाखाली मोटरसायकल घेवुन उभे असुन त्यांच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल आहेत. माहितीनुसार घटनास्थळावर जावुन त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याजवळ एक खाली मॅक्झिन मिळून आल्याने त्यांना विचारपूस करून त्यांनी विहिरीत टाकलेले देशी बनावटीच्या दोन पिस्तूल आणि ९ जिवंत राऊंड वीर एकलव्य आपात्कालीन पथकाच्या मदतीने पंचांसमक्ष विहीरीतून बाहेर काढले. 

यातील आरोपी अजय तुलाराम देठे(२७) रा. धोबीपुरा अकोट, प्रफुल्ल विनायक चव्हाण(२५) रा. अडगाव बु. ता. तेल्हारा जि. अकोला यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याविरुदधकलम ३,२५ आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. यातील दोन्ही आरोपींनी गुन्ह्याच्या तपासात मास्टरमाइंड असलेला तिसरा आरोपी शुभम रामेश्वर लोणकर(२५) रा. नेवरी ता. अकोट, ह.मु. भालेकर वरती, वारजे, पुणे निष्पन्न करून त्याचा उजैन मध्यप्रदेश येथे जावुन शोध घेतला असता तो तेथुन पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यास भालेकर वस्ती, वारजे, पुणे येथुन ३० जानेवारी रोजी अटक करून त्यास अकोट न्यायालयात हजर केले असता त्याला तीन पोलिस कोठडी मिळाली.

एक आरोपी गॅंगस्टरच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न
तपासा दरम्यान आरोपी शुभम लोणकर याचे मोबाईलवरून गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉल, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यासोबत ऑडिओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन अकोट शहर व स्थानिक गुन्हे शाखा अकोला करीत आहे. ही कारवाई अकोटचे एसडीपीओ अनमोल मित्तल, एलसीबीचे प्रमुख शंकर शेळके, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे करीत आहेत.

Web Title: The youth, in contact with gangster Bishnoi, seized two pistols with live cartridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.