सासवड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:15 AM2018-12-27T00:15:34+5:302018-12-27T00:16:15+5:30

सासवड येथील एका युवकाने राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Suicide by taking a youth's death in Saswad | सासवड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या  

सासवड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या  

googlenewsNext

सासवड - सासवड येथील एका युवकाने राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुषार नारायण खळदे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. चुलते ज्ञानेश्वर दिगंबर खळदे यांनी सासवड पोलिसांत घटनेची खबर दिली आहे.
मंगळवार, दि. २५ रोजी तुषार खळदे याचे आईवडील आणि कुटुंबातील सर्व सदस्य देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. तुषार खळदे यांनी आपली परीक्षा असल्याने येता येणार नसल्याचे सांगून जाण्याचे टाळले. दरम्यान, संबंधित सर्वजण देवदर्शनावरून परत सायंकाळी ६. ३० च्या दरम्यान आले असता, घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यामुळे त्यास आवाज दिला, परंतु आतून प्रतिसाद मिळाला नाही.
खिडकी उचकटून आत पाहिले असता तुषार हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडून आत
प्रवेश केला. रात्री उशिरा सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस
हवालदार आरडे हे याबाबत पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by taking a youth's death in Saswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे