Video : चेंबूरमध्ये स्वत:वर गोळी झाडून बिल्डरची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 15:57 IST2019-01-03T15:56:11+5:302019-01-03T15:57:26+5:30
आज सकाळी ११. २५ वाजताच्या सुमारास बिल्डर संजय अग्रवाल (५७) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी घरी भावोजी आणि मुलगा हे देखील होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे

Video : चेंबूरमध्ये स्वत:वर गोळी झाडून बिल्डरची आत्महत्या
मुंबई - चेंबूरमध्ये एका बिल्डरने कार्यालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज सकाळी ११. २५ वाजताच्या सुमारास बिल्डर संजय अग्रवाल (५७) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेदरम्यान केबिनबाहेर भावोजी, वाहिनी, मुलगा आणि कर्मचारी हे देखील होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चेंबूरमधले प्रसिद्ध बिल्डर संजय अग्रवाल हे संजोना विकासकचे मालक आहेत. त्यांनी घरात परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून घेतल्या. त्यांच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.चेंबूर येथील सिंधी कॉलनीमध्ये सन्जोना कॉम्प्लेक्स नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ते होते. त्याच ठिकाणी त्यांचे कार्यालय देखील आहे. आज सकाळी ११. २५ वाजताच्या दरम्यान त्यांनी राहत्या घरी स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळी झाडून घेतली. नंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या आत्महत्येमागील कारण मात्र समोर आलेले नाही असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या आत्महत्येमागील नेमके कारण मात्र समोर आलेले नाही. मात्र, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार चेंबूर येथील १० व्या रोडवरील प्रकल्प दिवसेंदिवस रेंगाळत असल्याने अग्रवाल तणावाखाली होते. त्यामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.